सह्याद्रीच्या कुशीत तिची भेट झाली

सह्याद्रीच्या कुशीत तिची भेट झाली, मधुर आवाजाची जाणीव झाली. पावसाळी वातावरणात नजरेस नजर भिडली, पुढे काही होण्या आधीच ती हळूच लाजली. थोडी गडबडली, थोडी बावरली, इतक्यात हळुवार पावसाची सर आली. पावसाने तिची केसं ही भिजली, वृक्ष वेली पुन्हा नव्याने बहरली आठवणी मागे ठेवून पाऊल वाटेवर निघाली, आड वाटेवर अचानक थबकली. मागे वळून पाहताच गालात हसली, इथेच त्या दोघांची मैत्री झाली.