How to Reach Kalsubai From Pune ( पुणे ते कळसुबाई कसे जाल )
लहानपणी पासून भूगोलाच्या पुस्तकात किवा मोठ्या लोकांन कडून ऐकत होतो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पण जस महाविद्यालयात जायला लागलो तेव्हा कळाल कि त्या शिखरावर सुद्धा जाता येत. मग तेव्हा पासून इंटरनेट वर कसे जायचे फोटो असे कायम शोधत होतो. आणि तो दिवस आला मी आणि माझा भाऊ निलेश अस आम्ही जायचं ठरवलं आणि २५/०३/२०१६ ला दुपारी जेवण करून घरून निघालो, शिवाजीनगर बस स्थानकातून संगमनेर ला जाणारी बस पकडली, आणि आमचा प्रवास सुरु झाला. साधारण २:३० -- ३:०० च्या बेतला आमची गाडी सुटली. खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला संगमनेर ला पोहचायला संध्याकाळी ७:०० वाजले. तिथे आम्ही चौकशी केली कि राजूर किवा बारी ला कस जायचं?? तर तिथून अशी माहिती मिळाली राजूर ला राहायची सोय चांगली नाही तर तेच्या अलीकडे अकोले नावच गाव आहे तिथे नीट राहता येईल. म बस ची चौकशी केली तर अकोले ची बस लगेच ८:०० वाजता होती आणि तिथूनच बारी किवा राजूर पर्यंत जाता येईल अस कळाल. म तिथे चहा घेतला आणि अकोले च्या गाडीत बसलो. साधारण रात्री ९:०० च्या बेताला आम्ही अकोले स्थानकात पोहचलो. तिथे उतरल्या उतरल्या चौकशी केली कि राजूर किवा ब...