Posts

Showing posts from 2022

गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा

Image
गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा शहारून कळ्या साऱ्या बहरती पुन्हा पुन्हा शब्द ते मधुर सारे थबकती ओठांवरी आकाशी पक्षी हे दसदिशास भटकती निळ्याशार पाण्यातुनी इंद्रधनू हे प्रतिबिंबती मृगनयनी डोळे तिचे हृदयास मोहून जाती रेशमी केसांनमधुनी प्राजक्त च्या माळा गुंफती चाहूल होता तिची आठवणी मनात कल्लोळ करती हातात हात तिचा कोमल अश्या आठवणींचा गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा

वजीर सुळका एक चित्तथरारक अनुभव

Image
आधीच्या माझ्या पोस्ट मध्ये वजीर सुळक्याचे वर्णन आहेचे. पण महाराष्ट्रातील सहयाद्री च्या दऱ्या खोऱ्यात आपण हिंडू फिरू लागलो कि आपल्याला हे अनेक वेगवेगळे डोंगर, दऱ्या, घाटवाटा, वेगवेगळ्या नाळी, किल्ले आणि अर्थातच सुळके हे आपल्याला साद घालू लागतात आणि आपली पाऊले अपोआपच तिकडे वळतात. माझे आज पर्यंत साधारण ५३ किल्ले पाहून झाले होते पण त्यात सुळक्याचा सहभाग/अनुभव नव्हता. पण त्याला साजेसे ट्रेक मात्र माझे झाले होते उदा:- ढाक चा बहीरी, अलंग-मदन-कुलंग, लिंगाणा, तैल-बैला इ. पण सुळक्याचा अनुभव नव्हता. बरेच जण बोली भाषेत म्हणतात सुरवात नेहमी लहान गोष्टीनी करावी म्हणजे जड गोष्टी पेलायची सवय लागते. पण माझे मत जरा वेगळेच आहे सुरवातच अवघड गोष्टींपासून करा म्हणजे सोप्पी गोष्ट अजून सोप्पी होते. मला माहिती असलेल्या सह्याद्री मधील काही सुळक्याची नावे खालील प्रमाणे १) कळकराई सुळका २) वानरलिंगी सुळका ३) वजीर सुळका ४) बाण सुळका ५) नवरा- नवरी सुळका साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करा

पुण्यातून वजीर सुळका येथे कसे पोहचाल (How to reach Vajir pinnacle from Pune)

Image
"वजीर" हे नाव ऐकताच बऱ्याच जणांचे हृदयाचे ठोके चुकतात. म तो वजीर बुद्धिबळाच्या पटावरचा असो की खरोखरी च्या युद्धा मधला. कारण दोन्ही कडे तितक्याच निर्भीड पणे तो उभा ठाकलेला असतो म्हणजे शत्रूशी दोन हात करायला. पण हा वजीर ना ही युद्धातील आहे किंवा बुद्धिबळातील हा वजीर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत मालेतील, ठाणे जिल्ह्यातील डोंगर रंगांमधील माहुली किल्ल्यापासून एकटा झालेला म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून " वजीर सुळका" होय. अनेक जणांना ह्याचा फोटो पाहूनच त्यांना घाम फुटतो पण आम्ही सह्य भटके, दुर्गवेडे आम्हाला वजीर कायम साद घालत असतो. आणि न कळतच कधी पाऊलं तिकडे वळतात कळत देखील नाही. ज्याची उंची २०० फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून २८०० फूट आहे. २०० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळप