Posts

Showing posts from 2020

खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही

Image
खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही । धन, धान्य, पशु, पक्षी, सर्वच प्राणी मात्रांची चांगलीच होती नांदी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अनेक आक्रमण पाहिले आम्ही । अनेक लढाया आणि महा पराक्रमी सुद्धा पाहिले आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अचानकच मोठी टोळी आली गोरी । उध्वस्त केले सारे काही । मग काही काळ निपचित पडलो आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। पुन्हा काही रांगड्या सवंगड्यांची आली टोळी । पुन्हा नव्याने समृद्ध होण्याची दिली संधी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। परत पूर्वीच्या समृद्धी ची आठवण हळू हळू होत होती । ह्यातच आली मोठी महामारी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। महामारी मुळे पुन्हा उध्वस्त होऊ का आम्ही?? तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।।

शेवटची भेट

Image
आज तिच्या सानिध्याची जाणीव झाली पण तिच्या अस्तित्वाची उणीव होती ठाऊक होते ती होणार होती माझी त्याच्या मनात जागा होती तिची पण एकदा निवांत भेटून बोलावं इच्छा होती तिची त्या दोघांनी परत भेटावं इच्छा नव्हती नियतीची ती वाट पहात होती त्याची पण तो समजूत काढत होता स्वतः ची आपण उशिरा गेलो तरीही ती जाणार नाही घरी ती आठवत होती त्या सुंदर क्षणांची जुळवाजुळव करत होती साऱ्या गोष्टींची करण तिला जाणीव झाली होती त्या सत्याची गरज होती दोघांना एकमेकांच्या भेटीची पण त्याला माहिती नव्हते आधीची च भेट होती दोघांची शेवटची

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )

Image
भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती. भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते. राजगुरुनगर-भोरगिरी रस्त्यावर असलेल्या चास गावातील गढी आणि दिपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी - भिमाशंकर हा ट्रेक अशी सर्व ठिकाण भोरगिरी किल्ल्या बरोबर पाहाता (करता) येतात. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. शेजारच्या वाड्यातला रुषिकेश खूप दिवस झाले माझ्या मागे लागला होता सौऱ्या किल्यावर जायचं आणि तुझ्याच बरोबर. आणि त्याच काळात आमच्या वाड्यातला तेजस भाऊ दुबई वरून परत आले हो

How to Reach Kenjalgad Fort from Pune ( कसे जाल केंजळगडावर )

Image
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत. बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६