Posts

Showing posts with the label Shivaji Maharaj

पुण्यातून किल्ले चंदन-वंदन ला कसे जाल (How to Reach Chandan-Vandan fort from Pune)

Image
हि पोस्ट लिहायला खर तर तसा चांगलाच उशीर झाला आहे पण असो. बरेच दिवस झाले कुठे गेलो नव्हतो आणि solo trek पण केला नव्हता. एक दिवस सुट्टी मिळाली तारीख होती २९ मार्च २०२३. मग काय आदल्या दिवशी रात्री साताऱ्या लागत असलेल्या चंदन-वंदन या जोड गोळीची निश्चिती केली. इंटरनेट आणि पुस्तकात ज्याबद्दल वाचल होत ते आज पाहायला मिळणार. खूप उत्सुकता होती. साधारण पहाटे ५ वाजता घर सोडल आणि प्रवास चालू झाला.थोडा वेळ वाट पाहून शनिवारवाडा ते स्वारगेट अशी PMT मिळाली. स्वारगेट बस स्थानकामध्ये साधारण ५:३० वाजता पोहचलो, तिथे कळले कि साताऱ्या ला जाणारी गाडी ६:०० वाजता निघणार आहे. मग गाडी मध्ये बसून गाडी निघायची वाट पाहत होतो. वेळ होताच गाडी निघाली आणि आता खऱ्या अर्थाने माझा गडांच्या कडे जाणारा प्रवास चालू झाला होता. साधारणपणे इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले.हि जोड गोळी गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले या प्रकारामध...

खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही

Image
खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही । धन, धान्य, पशु, पक्षी, सर्वच प्राणी मात्रांची चांगलीच होती नांदी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अनेक आक्रमण पाहिले आम्ही । अनेक लढाया आणि महा पराक्रमी सुद्धा पाहिले आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अचानकच मोठी टोळी आली गोरी । उध्वस्त केले सारे काही । मग काही काळ निपचित पडलो आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। पुन्हा काही रांगड्या सवंगड्यांची आली टोळी । पुन्हा नव्याने समृद्ध होण्याची दिली संधी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। परत पूर्वीच्या समृद्धी ची आठवण हळू हळू होत होती । ह्यातच आली मोठी महामारी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। महामारी मुळे पुन्हा उध्वस्त होऊ का आम्ही?? तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।।

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )

Image
भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती. भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते. राजगुरुनगर-भोरगिरी रस्त्यावर असलेल्या चास गावातील गढी आणि दिपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी - भिमाशंकर हा ट्रेक अशी सर्व ठिकाण भोरगिरी किल्ल्या बरोबर पाहाता (करता) येतात. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. शेजारच्या वाड्यातला रुषिकेश खूप दिवस झाले माझ्या मागे लागला होता सौऱ्या किल्यावर जायचं आणि तुझ्याच बरोबर. आणि त्याच काळात आमच्या वाड्यातला तेजस भाऊ दुबई वरून परत आले हो...

How to Reach Kenjalgad Fort from Pune ( कसे जाल केंजळगडावर )

Image
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत. बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ ...

How to Reach Ghangad Fort from Pune ( कासे जाल घनगडावर )

Image
घनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या लोणावळ्या पासुन साधारण ३० किलोमीटर असलेल्या एकोले या गावाजवळ आहे, हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. हा किल्ला अंदाजे ३००० फूट उंच असून फारसा अवघड नाही. ह्या किल्ल्याची फार अशी माहिती उपलब्ध नसल्याने इतिहासा बद्दल मला तरी माहिती नाही. पण ह्या किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केली होती. नंतर पुरंदरच्या तहामध्ये हा महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. त्या नंतर महाराजांनी परत तो घेतला त्या नंतर तो राजाराम महाराजांपर्यंत मराठ्यांकडे होता. त्यांच्या मृत्यु नंतर तो परत मोघालांकडे गेला. त्या नंतर परत तो महाराणी ताराबाई यांनी घेतला. या नंतर हाच किल्ला कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे दिला त्यानंतर त्यांनी बालाजी विश्वनाथ पेशवे यांना दिला त्यानंतर त्या दरम्यान मराठ्यांनी कोकणातल्या वाईट लोकांवर आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. तेव्हा ह्या किल्ल्यावर २५ सैनिक होते त्यांनी पण ह्यात सहभाग घेतला होता. नंतर ह्या किल्ल्याचा वापार पेशव्यांनी कैदी ठेवण्यासाठी केला. आणि सगळ्यात शेवटी १८१८ साली तो ब्रिटीश्यांच्या कडे गेला. अनेक दिवसांपा...

How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)

Image
राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. तसा मी राजमाची ला ३...