Posts

Showing posts from 2017

How to Reach Ghangad Fort from Pune ( कासे जाल घनगडावर )

Image
घनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या लोणावळ्या पासुन साधारण ३० किलोमीटर असलेल्या एकोले या गावाजवळ आहे, हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. हा किल्ला अंदाजे ३००० फूट उंच असून फारसा अवघड नाही. ह्या किल्ल्याची फार अशी माहिती उपलब्ध नसल्याने इतिहासा बद्दल मला तरी माहिती नाही. पण ह्या किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केली होती. नंतर पुरंदरच्या तहामध्ये हा महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. त्या नंतर महाराजांनी परत तो घेतला त्या नंतर तो राजाराम महाराजांपर्यंत मराठ्यांकडे होता. त्यांच्या मृत्यु नंतर तो परत मोघालांकडे गेला. त्या नंतर परत तो महाराणी ताराबाई यांनी घेतला. या नंतर हाच किल्ला कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे दिला त्यानंतर त्यांनी बालाजी विश्वनाथ पेशवे यांना दिला त्यानंतर त्या दरम्यान मराठ्यांनी कोकणातल्या वाईट लोकांवर आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. तेव्हा ह्या किल्ल्यावर २५ सैनिक होते त्यांनी पण ह्यात सहभाग घेतला होता. नंतर ह्या किल्ल्याचा वापार पेशव्यांनी कैदी ठेवण्यासाठी केला. आणि सगळ्यात शेवटी १८१८ साली तो ब्रिटीश्यांच्या कडे गेला. अनेक दिवसांपा

सुंदर असे वातावरण....

Image
सुंदर असे वातावरण नुकतीच थंडी पडायला सुरुवात झाली होती एका खोलीच साध छोटं पण मस्त असं घर वाडा सुद्धा असाच साधा जुना झालेला पण मस्त वाड्यात खूप शांतता फक्त झाडांच्या पानांचा आणि त्या दोघांच्या गप्पांचा आवाज अश्या ह्या सुंदर वातावरणात एक वेगळाच गंध आणि ह्यात ते दोघे मस्त रमून गेले होते त्यांना कशाचच भान नव्हतं पण काही काळानंतर तेच वातावरण तसेच दिवस तसेच घर तसाच वाडा तीच शांतता तोच गंध पण ह्या सगळ्या वातावरणा मध्ये तो होता पण ती काळाआड गेली होती.

आठवणीत तिच्या.....

आठवणीत तिच्या बसलो होतो एकटाच अस वाटत होतं येईल ती आत्ताच येता येता हसेल ती गालात आणि भरेल माझ्या मनात माझी नजर तिच्या डोळ्यात तिची नजर माझ्या डोळ्यात काजळ तिच्या डोळ्यात न माझ्यासाठी प्रेम तिच्या डोळ्यात तिच्याशी काय बोलावं हे माझ्या मनात न बोलता बोलता ती कशी येईल लाडात माझ्यासाठी गुलाबाचे फुल तिच्या हातात न तिच्यासाठी चॉकलेट माझ्या हातात फुल देताना फुलाचा काटा टोचेल तिच्या हातात मग तिचा हात धरेल मी माझ्या हातात

कुणी तरी असावं......

कुणी तरी असावं आपल्याला राजा म्हणणारं कुणी तरी असावं आपल्याला जवळ घेणारं कुणी तरी असावं आपल्याशी खूप वेळ बोलणारं कुणी तरी असावं आपल्याशी बोलता बोलता भांडणारं कुणी तरी असावं आपला राग शांत करणारं कुणी तरी असावं आपल्याला गोड गोड खायला देणारं कुणी तरी असावं फिरायला जाताना हातात हात घेणारं कुणी तरी असावं गाडीवर मागे बसणारं कुणी तरी असावं पाणी पुरी एकत्र खाणारं कुणी तरी असावं चित्रपट एकत्र पाहणारं कुणी तरी असावं रात्री उशिरा sms करणारं कुणी तरी असावं मला तू आवडतोस म्हणणारं...

How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)

Image
राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. तसा मी राजमाची ला ३

How to Reach KalavantinDurga Fort or PrabalGad Fort From Pune (कसे जाल कलावंतीण दुर्ग किंवा प्रबळगडावर)

Image
कलावंतीण आणि प्रबळगड हे जोड किल्ले आहेत प्रबळ माची हि ह्या दोन किल्ल्यांना वेग वेगळ करते. कलावंतीण हा एक सुळका आहे आणि अंदाजे महाराजांच्या काळी टेहळणी साठी वापर होत असेल अस वाटत. तर प्रबळगड आकाराने बराच मोठा तसेच उंचीने सुद्धा कलावंतीण पेक्षा उंच आहे. प्रबळगडावर आपल्याला फिरायला देखील बरच आहे मात्र कलावंतीण हा सुळका असल्या मुळे फिरता येत नाही पण बर्याच गिर्यारोहकांचे स्वप्ना असते कि ह्या किल्ल्यावर जावे. प्रबळगडावरून आपल्याला कलावंतीण चे दृश्य अगदी नीट पाहता येते. तसेच कलावंतीण चे खास आकर्षण असणाऱ्या सह्याद्री मधल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील एकदम नीट दिसतात. पावसाळ्या मध्ये कलावंतीण चा सुळका बऱ्याच वेळेला ढगातच असतो आणि बराच भाग ओला असल्यामुळे घसरडा देखील असतो. ठाकूरवाडी हे पायथ्याचे गाव असून पनवेल पासून एस.टी. ने अर्ध्याच तासात पोहोचतो. कलावंतीण दुर्ग ह्या किल्ल्यावर जाण्याची ईच्छा अनेक दिवसांपासून होती पण काही मुहूर्त लागेना आणि एकदा नाही हो करता करता तो दिवस ठरला १२ फेब्रुवारी २०१७. म्हणजे १२ तारखेला काहीही झाल तरीही मी एकटा का होईना जाणारच होतो आणि तशी मनाची तयारी पण केल