Posts

Showing posts with the label Prabalgad

How to Reach KalavantinDurga Fort or PrabalGad Fort From Pune (कसे जाल कलावंतीण दुर्ग किंवा प्रबळगडावर)

Image
कलावंतीण आणि प्रबळगड हे जोड किल्ले आहेत प्रबळ माची हि ह्या दोन किल्ल्यांना वेग वेगळ करते. कलावंतीण हा एक सुळका आहे आणि अंदाजे महाराजांच्या काळी टेहळणी साठी वापर होत असेल अस वाटत. तर प्रबळगड आकाराने बराच मोठा तसेच उंचीने सुद्धा कलावंतीण पेक्षा उंच आहे. प्रबळगडावर आपल्याला फिरायला देखील बरच आहे मात्र कलावंतीण हा सुळका असल्या मुळे फिरता येत नाही पण बर्याच गिर्यारोहकांचे स्वप्ना असते कि ह्या किल्ल्यावर जावे. प्रबळगडावरून आपल्याला कलावंतीण चे दृश्य अगदी नीट पाहता येते. तसेच कलावंतीण चे खास आकर्षण असणाऱ्या सह्याद्री मधल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील एकदम नीट दिसतात. पावसाळ्या मध्ये कलावंतीण चा सुळका बऱ्याच वेळेला ढगातच असतो आणि बराच भाग ओला असल्यामुळे घसरडा देखील असतो. ठाकूरवाडी हे पायथ्याचे गाव असून पनवेल पासून एस.टी. ने अर्ध्याच तासात पोहोचतो. कलावंतीण दुर्ग ह्या किल्ल्यावर जाण्याची ईच्छा अनेक दिवसांपासून होती पण काही मुहूर्त लागेना आणि एकदा नाही हो करता करता तो दिवस ठरला १२ फेब्रुवारी २०१७. म्हणजे १२ तारखेला काहीही झाल तरीही मी एकटा का होईना जाणारच होतो आणि तशी मनाची तयारी पण केल...