Posts

Showing posts with the label महाराष्ट्र

पुण्यातून वजीर सुळका येथे कसे पोहचाल (How to reach Vajir pinnacle from Pune)

Image
"वजीर" हे नाव ऐकताच बऱ्याच जणांचे हृदयाचे ठोके चुकतात. म तो वजीर बुद्धिबळाच्या पटावरचा असो की खरोखरी च्या युद्धा मधला. कारण दोन्ही कडे तितक्याच निर्भीड पणे तो उभा ठाकलेला असतो म्हणजे शत्रूशी दोन हात करायला. पण हा वजीर ना ही युद्धातील आहे किंवा बुद्धिबळातील हा वजीर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत मालेतील, ठाणे जिल्ह्यातील डोंगर रंगांमधील माहुली किल्ल्यापासून एकटा झालेला म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून " वजीर सुळका" होय. अनेक जणांना ह्याचा फोटो पाहूनच त्यांना घाम फुटतो पण आम्ही सह्य भटके, दुर्गवेडे आम्हाला वजीर कायम साद घालत असतो. आणि न कळतच कधी पाऊलं तिकडे वळतात कळत देखील नाही. ज्याची उंची २०० फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून २८०० फूट आहे. २०० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळप...