Posts

Showing posts with the label Lonavala

How to Reach Ghangad Fort from Pune ( कासे जाल घनगडावर )

Image
घनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या लोणावळ्या पासुन साधारण ३० किलोमीटर असलेल्या एकोले या गावाजवळ आहे, हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. हा किल्ला अंदाजे ३००० फूट उंच असून फारसा अवघड नाही. ह्या किल्ल्याची फार अशी माहिती उपलब्ध नसल्याने इतिहासा बद्दल मला तरी माहिती नाही. पण ह्या किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केली होती. नंतर पुरंदरच्या तहामध्ये हा महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. त्या नंतर महाराजांनी परत तो घेतला त्या नंतर तो राजाराम महाराजांपर्यंत मराठ्यांकडे होता. त्यांच्या मृत्यु नंतर तो परत मोघालांकडे गेला. त्या नंतर परत तो महाराणी ताराबाई यांनी घेतला. या नंतर हाच किल्ला कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे दिला त्यानंतर त्यांनी बालाजी विश्वनाथ पेशवे यांना दिला त्यानंतर त्या दरम्यान मराठ्यांनी कोकणातल्या वाईट लोकांवर आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. तेव्हा ह्या किल्ल्यावर २५ सैनिक होते त्यांनी पण ह्यात सहभाग घेतला होता. नंतर ह्या किल्ल्याचा वापार पेशव्यांनी कैदी ठेवण्यासाठी केला. आणि सगळ्यात शेवटी १८१८ साली तो ब्रिटीश्यांच्या कडे गेला. अनेक दिवसांपा...

How to Reach Tung Fort From Pune (कसे जाल तुंग किल्ल्यावर)

Image
पुणे रेल्वे स्टेशन वरून सकाळी ८.०० वाजता ची पुणे ते लोणावळा लोकल मधून लोणावळ्यात सकाळी ९.४५ वाजता पोहचलो. तिथून शिवाजी उद्यान पर्यंत चालत गेलो. शिवाजी उद्यान च्या समोर बस थांबा आहे. तिथे चौकशी केली तुंग वाडी ला कसं जायचं? तर अशी माहिती मिळाली. १०.०० एक बस काळे-पिसोळी किंवा तुंगी फाट्या पर्यंत जाते. शिवाजी उद्यान पासून संध्याकाळी ४:३० वाजता एकच बस आहे आणि ती तुंग वाडी गावात मुक्कामी असते आणि सकाळी साधारण ७ वाजता परतते. पण आम्ही बस ची वाट न पाहता तिथल्या शेअर गाडी मधून त्या फाट्या पर्यंत पोहचलो. शिवाजी उद्यान ते काळे-पिसोळी फाटा किंवा तुंगी फाटा तिथपर्यंत पोहचायला अंदाजे २० मिनिटे लगतात. तिथून साधारण १ तास चालत गेल कि आपण तुंग किल्ल्या च्या पायथ्या पर्यंत पोहोचतो. आम्ही फाट्या पासून १०:३० वाजता चालायला सुरवात केली. किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही १२:०० वाजता पोहचलो. वाटे मध्ये फार कमी वाहनांची वर्दळ जाणवते. रस्त्या च्या दोन्ही बाजूना मस्त झाडी आहेत. मध्य वाटे वर वान्नारंच वास्त्यव्य आहे. पण आपली चाहूल लागताच ते पळून जातात. किल्ल्याच्या पायथ्याला एक मंदिर आहे. तसेच तिथे गाड्या पैसे देऊन ल...