Posts

Showing posts from October, 2016

आज ती खूप दिवसांनी स्वप्नात आली

आज ती खूप दिवसांनी स्वप्नात आली असे वाटले कि हि मोगऱ्याची कळी फक्त माझ्यासाठीच उमलली. चिंब भिजलेली, थंडीने गारठलेली, पण तरीही माझ्यावर रुसलेली. थोडी शहारलेली, थोडी घाबरलेली, पण नजरेस नजर भिडवून डोळ्यांनेच बोलणारी. हळूच लाजणारी अन गालातल्या गालात हसणारी पण अजूनही हिरमुसलेली. घाबरत घाबरत हातात हात घेणारी, गोड गोड आवाजात बोलणारी. पण स्वप्नात सुद्धा अशी काही झलक देऊन गेली कि जाता जाता तिची अजून एक कायमची आठवण मनात ठेऊन गेली.

परत एकदा ......

Image
परत एकदा त्या संध्याकाळ ची वाट पहायचीये परत एकदा त्या बागेतल्या बाकावर बसायचय परत एकदा त्या वातावरणाचा आस्वाद घेयचाय परत एकदा त्या वातावरणात तिची वाट पहायचीये परत एकदा तिला सावकाश येताना पहायचंय परत एकदा हळुवार वऱ्या नी उडणारे तिचे केस पहायचे आहेत परत एकदा तिचा हसरा चेहरा पहायचाय परत एकदा तिला असाच जवळ आलेल पहायचंय परत एकदा तिने माझ्या जवळ येताच विचाराव "कधी आलास"??परत एकदा तिला शेजारी बसताना हळूच पहायचंय परत एकदा तिच्याशी बोलता बोलता तिच्याच नजरेत हरवून जायचंय परत एकदा नजरेत हरवून जाईपर्यंत तिचे ते शब्द ऐकू येतात"चल खूप वेळ झाला उशीर होतोय"..... परत एकदा तिला जाता जाता थांबवायचंय परत एकदा तिची वाट पहात त्या बाकावर बसायचंय परत एकदा तिची वाट पहात त्या बाकावर बसायचंय.........

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

Image
राजगड हा किल्ला पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर आहे. गुंजवणी गाव हे पायथ्याच गाव आहे. राजगडला मुरुंबदेवाचा डोंगर असेही म्हणतात. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय महत्वाचा होता कारण ह्या किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी कोणती ना कोणती नदी पार करूनच पोहोचावे लागत होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी केली होती. मी बऱ्याच वेळा राजगडावर गेलो होतो. पण आमच्या वाड्या मधले माझे ३ मित्र ह्या किल्ल्यावर कधीच गेले नव्हते. आणि मी असाच एकदा ऑफिस मधून घरी आलो आणि सगळे मित्र कट्यावर बसून चर्चा करत होते तितक्यात मी तिथे पोहचलो, मी त्यांना काही विचारायच्या आधीच त्यांनी मला विचारले अरे राजगडावर जायचय येणार का??? मी पटकन हो म्हंटल त्यांना ते कळलाच नाही. कारण नेहमी मला बाहेर कुठे येणार का म्हणून विचारल तर मी नेहमी त्यांना काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचो. ते खूप खुश झाले. लगेच म तारीख ठरवून टाकली ४ आणि ५ जुन २०१६. म फुल चर्चा चालू झाली कधी निघायचं त्या दिवशी?? काय काय घ्याव लागेल?? मी पण त्यांना सांगत होतो. ठरल्या प्रमाणे आम