Posts

Showing posts from February, 2024

वैराट गड - आयुष्यातील एक असाही प्रसंग

Image
किल्ले चंदन-वंदन पाहून आता माझ्याकडे अर्धा दिवस उरला होता. आता वैराट गडाची भ्रमंती करायचे निश्चित झाले होते. वैराट गडावर जाण्यासाठी आपल्याला व्याजवाडी या गावी पोहचावे लागते. व्याजवाडी हे वैराटगडाच्या पायथ्याचे गाव आहे. लालपरी ची वाट पाहत आता मी गणेश खिंडीत थांबलो होतो. १२ वाजता गाडी येणार असे स्थानिकांनी सांगितले. पण वेळेवर येईल ती लालपरी कसली. ती आली १२:३० वाजता. आणि आता माझी वाटचाल आजच्या दिवसातल्या तिसऱ्या गडाकडे चालू झाली होती. हि लालपरी भुईंज या बस स्थानकावर पुन्हा जाणार होती. पण मला व्याजवाडी ला जायचे होते. मी गाडीत बसल्यावर तसे तिकीट काढताना कंडक्टर काकांना विचारले तर त्यांनी सांगितले कि तुम्ही कडेगाव पूल या बस थांब्यावर उतरा आणि तिथून पुढे व्याजवाडी साठी जावा. आणि कडेगावपूल हे तिकीट हातात दिल आणि कंडक्टर पुढे सरकले. मी आता मस्त खिडकी जवळची जागा हेरून बसलो होतो. ग्रामीण साताऱ्याचा मस्त अनुभव मला खिडकीतून दिसत होता. लहानशी घरे, समोर आंगण त्याच्या बाजूला असतील तर काही वेळेस जनावर किंवा लहानगे एकमेकांशी आनंदाने खेळणारे शिवाय भर उन्हात आल्हाद दायक असा हिरवा निसर्ग. कारण हा किल्