Posts

Showing posts from September, 2016

How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )

Image
अनेक जणान कडून ऐकल होत कोरीगड खूप मस्त किल्ला आहे, सोप्पा आहे, किल्ल्यावर जायला पायऱ्या देखील आहेत. आणि महत्वाच म्हणजे लहान मुलांची म्हणजे १ ली ते ४ थी ची मुल सुद्धा ह्या किल्ल्यावर सहज जाऊ शकतात. माझे मित्र दोन वेळा ह्या किल्ल्यावर जाऊन आले पण मला त्या दोन्ही वेळेस जमल नव्हत. तेव्हाच मी ठरवल होत वेळ मिळाला कि नक्की ह्या किल्ल्यावर जायचं. पण कस जायचं कुठून बस पकडायची काहीच माहिती नव्हतं म जे मित्र जाऊन आले होते त्यांना विचारल होत आणि इंटरनेट वर पण शोधलं होत. नक्की आठवत नाही पण मे महिन्याच्या शेवटी किवा जून महिन्याच्या सुरवातीला अचानक ठरवलं दुपारी मी आणि माझा मित्र अनुराग त्याला घरातून उचलून घेऊन गेलो होतो साधारण दुपारी निघालो होतो. आणि लोणावळ्यात शिवाजी उद्यान पाशी साधारण संध्याकाळी ४ च्या बेतला पोहचलो. आणि तिथे चौकशी केली पण अस कळाल कि आता गावाच्या पायथ्या पर्यंत जाऊ शकतो आणि किल्ला पण पाहू शकतो पण परत लोणावळ्यात येयला वाहनाची सोय नसेल. म तिथूनच परत फिरलो पण आता माझी ईच्छा आजुनच वाढली होती आता त्या किल्ल्यावर जायची.... आणि एकदाच २३/०६/२०१६ ला रात्री तीन मित्रांना फोन केला आणि विच

How to Reach Kalsubai From Pune ( पुणे ते कळसुबाई कसे जाल )

Image
लहानपणी पासून भूगोलाच्या पुस्तकात किवा मोठ्या लोकांन कडून ऐकत होतो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पण जस महाविद्यालयात जायला लागलो तेव्हा कळाल कि त्या शिखरावर सुद्धा जाता येत. मग तेव्हा पासून इंटरनेट वर कसे जायचे फोटो असे कायम शोधत होतो. आणि तो दिवस आला मी आणि माझा भाऊ निलेश अस आम्ही जायचं ठरवलं आणि २५/०३/२०१६ ला दुपारी जेवण करून घरून निघालो, शिवाजीनगर बस स्थानकातून संगमनेर ला जाणारी बस पकडली, आणि आमचा प्रवास सुरु झाला. साधारण २:३० -- ३:०० च्या बेतला आमची गाडी सुटली. खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला संगमनेर ला पोहचायला संध्याकाळी ७:०० वाजले. तिथे आम्ही चौकशी केली कि राजूर किवा बारी ला कस जायचं?? तर तिथून अशी माहिती मिळाली राजूर ला राहायची सोय चांगली नाही तर तेच्या अलीकडे अकोले नावच गाव आहे तिथे नीट राहता येईल. म बस ची चौकशी केली तर अकोले ची बस लगेच ८:०० वाजता होती आणि तिथूनच बारी किवा राजूर पर्यंत जाता येईल अस कळाल. म तिथे चहा घेतला आणि अकोले च्या गाडीत बसलो. साधारण रात्री ९:०० च्या बेताला आम्ही अकोले स्थानकात पोहचलो. तिथे उतरल्या उतरल्या चौकशी केली कि राजूर किवा ब

How to Reach Tung Fort From Pune (कसे जाल तुंग किल्ल्यावर)

Image
पुणे रेल्वे स्टेशन वरून सकाळी ८.०० वाजता ची पुणे ते लोणावळा लोकल मधून लोणावळ्यात सकाळी ९.४५ वाजता पोहचलो. तिथून शिवाजी उद्यान पर्यंत चालत गेलो. शिवाजी उद्यान च्या समोर बस थांबा आहे. तिथे चौकशी केली तुंग वाडी ला कसं जायचं? तर अशी माहिती मिळाली. १०.०० एक बस काळे-पिसोळी किंवा तुंगी फाट्या पर्यंत जाते. शिवाजी उद्यान पासून संध्याकाळी ४:३० वाजता एकच बस आहे आणि ती तुंग वाडी गावात मुक्कामी असते आणि सकाळी साधारण ७ वाजता परतते. पण आम्ही बस ची वाट न पाहता तिथल्या शेअर गाडी मधून त्या फाट्या पर्यंत पोहचलो. शिवाजी उद्यान ते काळे-पिसोळी फाटा किंवा तुंगी फाटा तिथपर्यंत पोहचायला अंदाजे २० मिनिटे लगतात. तिथून साधारण १ तास चालत गेल कि आपण तुंग किल्ल्या च्या पायथ्या पर्यंत पोहोचतो. आम्ही फाट्या पासून १०:३० वाजता चालायला सुरवात केली. किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही १२:०० वाजता पोहचलो. वाटे मध्ये फार कमी वाहनांची वर्दळ जाणवते. रस्त्या च्या दोन्ही बाजूना मस्त झाडी आहेत. मध्य वाटे वर वान्नारंच वास्त्यव्य आहे. पण आपली चाहूल लागताच ते पळून जातात. किल्ल्याच्या पायथ्याला एक मंदिर आहे. तसेच तिथे गाड्या पैसे देऊन ल