Posts

वैराट गड - आयुष्यातील एक असाही प्रसंग

Image
किल्ले चंदन-वंदन पाहून आता माझ्याकडे अर्धा दिवस उरला होता. आता वैराट गडाची भ्रमंती करायचे निश्चित झाले होते. वैराट गडावर जाण्यासाठी आपल्याला व्याजवाडी या गावी पोहचावे लागते. व्याजवाडी हे वैराटगडाच्या पायथ्याचे गाव आहे. लालपरी ची वाट पाहत आता मी गणेश खिंडीत थांबलो होतो. १२ वाजता गाडी येणार असे स्थानिकांनी सांगितले. पण वेळेवर येईल ती लालपरी कसली. ती आली १२:३० वाजता. आणि आता माझी वाटचाल आजच्या दिवसातल्या तिसऱ्या गडाकडे चालू झाली होती. हि लालपरी भुईंज या बस स्थानकावर पुन्हा जाणार होती. पण मला व्याजवाडी ला जायचे होते. मी गाडीत बसल्यावर तसे तिकीट काढताना कंडक्टर काकांना विचारले तर त्यांनी सांगितले कि तुम्ही कडेगाव पूल या बस थांब्यावर उतरा आणि तिथून पुढे व्याजवाडी साठी जावा. आणि कडेगावपूल हे तिकीट हातात दिल आणि कंडक्टर पुढे सरकले. मी आता मस्त खिडकी जवळची जागा हेरून बसलो होतो. ग्रामीण साताऱ्याचा मस्त अनुभव मला खिडकीतून दिसत होता. लहानशी घरे, समोर आंगण त्याच्या बाजूला असतील तर काही वेळेस जनावर किंवा लहानगे एकमेकांशी आनंदाने खेळणारे शिवाय भर उन्हात आल्हाद दायक असा हिरवा निसर्ग. कारण हा किल्

पुण्यातून किल्ले चंदन-वंदन ला कसे जाल (How to Reach Chandan-Vandan fort from Pune)

Image
हि पोस्ट लिहायला खर तर तसा चांगलाच उशीर झाला आहे पण असो. बरेच दिवस झाले कुठे गेलो नव्हतो आणि solo trek पण केला नव्हता. एक दिवस सुट्टी मिळाली तारीख होती २९ मार्च २०२३. मग काय आदल्या दिवशी रात्री साताऱ्या लागत असलेल्या चंदन-वंदन या जोड गोळीची निश्चिती केली. इंटरनेट आणि पुस्तकात ज्याबद्दल वाचल होत ते आज पाहायला मिळणार. खूप उत्सुकता होती. साधारण पहाटे ५ वाजता घर सोडल आणि प्रवास चालू झाला.थोडा वेळ वाट पाहून शनिवारवाडा ते स्वारगेट अशी PMT मिळाली. स्वारगेट बस स्थानकामध्ये साधारण ५:३० वाजता पोहचलो, तिथे कळले कि साताऱ्या ला जाणारी गाडी ६:०० वाजता निघणार आहे. मग गाडी मध्ये बसून गाडी निघायची वाट पाहत होतो. वेळ होताच गाडी निघाली आणि आता खऱ्या अर्थाने माझा गडांच्या कडे जाणारा प्रवास चालू झाला होता. साधारणपणे इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले.हि जोड गोळी गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले या प्रकारामध

शब्द अपुरे आहेत

Image
खुप काही बोलायच आहे पण शब्द अपुरे आहेत, जरी नसली जवळ तु माझ्या, पण माझे मन तुझ्या कडे आहे. शब्द माझ्या मनात आहेत, भावना तुझ्या मनात आहेत, पायातील पैंजण तुझ्या नाजुक स्वरांचे गीत आहेत. होता स्पर्श तुझ्या हातांचा प्राजक्त सुध्दा फुलत आहेत, लांब सडक केसांतुनी भर उन्हात सुध्दा सावली देत आहे. नाजुक तुझ्या नेत्रांमधून अजूनही मला शोधत आहेस, कोमल तुझ्या ओठांवरी अजूनही माझेच नाव आहे. खुप काही बोलायच आहे पण शब्द अपुरे आहेत, जरी नसली जवळ तु माझ्या, पण माझे मन तुझ्या कडे आहे.

आठवण....

Image
आठवण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची, शोधूनी सह्यवाटा संपती,  ओढ लागे हळव्या मनाला तिच्या परत भेटीची....  घनदाट लांब केसातूनी, फुलांच्या माळा गुंफती सौंदर्याने तिच्या सह्याद्रीतील करावी सुध्दा लाजती मधुर असे ते बोल तिचे, गोजीरे गीत गाती रानातील पक्षी सारे, बोल तिचेच ऐकती  पाणीदार डोळे तिचे, शब्दानं विनाच बोलती स्पर्श होता तिचा हाताला, अंग सारे शहारती नजरेस नजर भिडता, मला घायाळ करती ठाऊक नाही काही, तरीही ती लाजती मिठीत घेता तिला, शिंपल्यात मोती निर्मिती  मोत्यांच्या माळातुनी, सुरेख हार निर्मिती  आठवण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची,  शोधूनी सह्यवाटा संपती,  ओढ लागे हळव्या मनाला तिच्या परत भेटीची.....

गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा

Image
गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा शहारून कळ्या साऱ्या बहरती पुन्हा पुन्हा शब्द ते मधुर सारे थबकती ओठांवरी आकाशी पक्षी हे दसदिशास भटकती निळ्याशार पाण्यातुनी इंद्रधनू हे प्रतिबिंबती मृगनयनी डोळे तिचे हृदयास मोहून जाती रेशमी केसांनमधुनी प्राजक्त च्या माळा गुंफती चाहूल होता तिची आठवणी मनात कल्लोळ करती हातात हात तिचा कोमल अश्या आठवणींचा गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा

वजीर सुळका एक चित्तथरारक अनुभव

Image
आधीच्या माझ्या पोस्ट मध्ये वजीर सुळक्याचे वर्णन आहेचे. पण महाराष्ट्रातील सहयाद्री च्या दऱ्या खोऱ्यात आपण हिंडू फिरू लागलो कि आपल्याला हे अनेक वेगवेगळे डोंगर, दऱ्या, घाटवाटा, वेगवेगळ्या नाळी, किल्ले आणि अर्थातच सुळके हे आपल्याला साद घालू लागतात आणि आपली पाऊले अपोआपच तिकडे वळतात. माझे आज पर्यंत साधारण ५३ किल्ले पाहून झाले होते पण त्यात सुळक्याचा सहभाग/अनुभव नव्हता. पण त्याला साजेसे ट्रेक मात्र माझे झाले होते उदा:- ढाक चा बहीरी, अलंग-मदन-कुलंग, लिंगाणा, तैल-बैला इ. पण सुळक्याचा अनुभव नव्हता. बरेच जण बोली भाषेत म्हणतात सुरवात नेहमी लहान गोष्टीनी करावी म्हणजे जड गोष्टी पेलायची सवय लागते. पण माझे मत जरा वेगळेच आहे सुरवातच अवघड गोष्टींपासून करा म्हणजे सोप्पी गोष्ट अजून सोप्पी होते. मला माहिती असलेल्या सह्याद्री मधील काही सुळक्याची नावे खालील प्रमाणे १) कळकराई सुळका २) वानरलिंगी सुळका ३) वजीर सुळका ४) बाण सुळका ५) नवरा- नवरी सुळका साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करा

पुण्यातून वजीर सुळका येथे कसे पोहचाल (How to reach Vajir pinnacle from Pune)

Image
"वजीर" हे नाव ऐकताच बऱ्याच जणांचे हृदयाचे ठोके चुकतात. म तो वजीर बुद्धिबळाच्या पटावरचा असो की खरोखरी च्या युद्धा मधला. कारण दोन्ही कडे तितक्याच निर्भीड पणे तो उभा ठाकलेला असतो म्हणजे शत्रूशी दोन हात करायला. पण हा वजीर ना ही युद्धातील आहे किंवा बुद्धिबळातील हा वजीर आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत मालेतील, ठाणे जिल्ह्यातील डोंगर रंगांमधील माहुली किल्ल्यापासून एकटा झालेला म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून " वजीर सुळका" होय. अनेक जणांना ह्याचा फोटो पाहूनच त्यांना घाम फुटतो पण आम्ही सह्य भटके, दुर्गवेडे आम्हाला वजीर कायम साद घालत असतो. आणि न कळतच कधी पाऊलं तिकडे वळतात कळत देखील नाही. ज्याची उंची २०० फूट एवढी आहे. तर माहूली किल्ला हा समुद्र सपाटीपासून २८०० फूट आहे. २०० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार जवळप