रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला,

रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला. मी निघालो होतो तिच्या भेटीला, जुन्या भेटींच्या आठवणी त्या प्रितीच्या. क्षणात चेहरा तिचा मनी माझ्या अवतरला, गळयात माळा तिच्या मोत्यांच्या. केसात मोगऱ्याच्या माळा गुंफलेल्या, साडीचा रंग तिचा निळ्या शार आकाशाच्या. गालांवर तिच्या जणु गुलाबाचा रंग उतरलेला, कोमल अश्या स्वरांनी तिच्या मी मात्र घायाळ झालेला. स्पर्श होता तिचा माझ्या अंगाला, शहारा येई माझ्या अंगाला. रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला.