पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

नमस्कार मित्रानो बऱ्याच दिवसांनी आणि माझ्या यादीतील बहुप्रतीक्षित दुर्गांपैकी एक म्हणजे सिंदोळा दुर्ग. ह्या दुर्गाचा इतिहास फारसा उजेडात न आल्याने ह्याची माहिती बऱ्याच जणांना माहितीच नाही. उत्तर कोकणातील बंदरांना जुन्नर (जिर्णनगर) या घाटमाथ्यावरील बाजारपेठेला जोडणार्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले वेगवेगळ्या काळात बांधले गेले. जुन्नरचे रक्षण करणारा शिवनेरी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हडसर, चावंड, जिवधन, नारायणगड,ह्नुमंतगड-निमगिरी आणि सिंदोळा या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. जूना माळशेज घाट चढून गेल्यावर त्याच्या माथ्यावर असणार्या सिंदोळा किल्ल्याची निर्मिती ही प्रामुख्याने घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती . ह्या दुर्गावर अखेर जाण्याचा योग आला तो म्हणजे ५ जुलै २०२४ ला. खर तर बाल मैत्रिण तिच्या सोबत पर्वतदुर्ग म्हणजेच हडसर दुर्गाची सफर करणार होतो पण आयत्यावेळी तिला काही तरी काम आल आणि त्यामुळे तिचे रद्द झाले. म काय मधला अधला वार असल्याने मला जरा सोबत कुणी येईल का नाही याची शंका च होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला मागचा वैराट दुर्गाचा...