Posts

Showing posts from 2025

मनातील सिंहगड

Image
मेट्रो मधुन प्रवास करताना दिसते सह्याद्रीची डोंगर रांग, सिंहगडा अरे किती आठवणी आहेत तुझ्या हे तुच मला सांग. कामाच्या व्यापामुळे डोक्यामध्ये असतो नुसता ताण, मेट्रो मधुन घरी जाताना, पाहता तुज हरपते माझे भान. सह्य भटक्यांच्या मनात आहे तुझ्या साठी आहे कायम आदराचे स्थान, स्वराज्य राखण्यासाठी तान्हाजीरावांनी दिल स्वतःच बलिदान. तुझा इतिहास आठवताच उंच होते अभिमाने मान. थोर इतिहास कार, शाहीर मावळे गाती तुझे शौर्य गान. सर्व ट्रेकर मंडळींना कायम घालितो तु साद, म्हणुनच तु घरं केलं आहेस आमच्या सर्वांच्या हृदयात. © सौरभ अग्निहोत्री.

स्मित हास्य तिचे खुलले

Image
पाहुनी गुलाब पुष्प, स्मित हास्य तिचे खुलले, मृग नक्षत्रातील सरींनी, सह्याद्रीतील डोंगर–दऱ्या, हीरवाई न बहरले. मनमोहक अशा वातावरणात दोघांतील प्रेम देखील बहरले, त्या दोघांचे प्रेम पाहून, गुलाब पुष्प देखील लाजले. खळखळणारे झरे देखील जागीच थबकले, मदनाच्या वाऱ्याने ढग सुद्धा सरले. जिथे फुलांचे गंधही तिच्यासाठी थांबून राहिले, तिच्या प्रत्येक नजरेत एक अव्यक्त गूज होते दडले. ओलसर मातीच्या दरवळात तिच्या आठवणी रुजल्या, पावसाच्या सरींमध्ये शब्दही नकळत भिजून गेले. त्या धुके छादीत डोंगरावर आम्ही आपली स्वप्ने रेखाटली, एकमेकांच्या नजरेतच आमची सगळी दुनिया सामावली.

रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला,

Image
रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला. मी निघालो होतो तिच्या भेटीला, जुन्या भेटींच्या आठवणी त्या प्रितीच्या. क्षणात चेहरा तिचा मनी माझ्या अवतरला, गळयात माळा तिच्या मोत्यांच्या. केसात मोगऱ्याच्या माळा गुंफलेल्या, साडीचा रंग तिचा निळ्या शार आकाशाचा. गालांवर तिच्या जणु गुलाबाचा रंग उतरलेला, कोमल अश्या स्वरांनी तिच्या मी मात्र घायाळ झालेला. स्पर्श होता तिचा माझ्या अंगाला, शहारा येई माझ्या अंगाला. रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला.