Posts

Showing posts from 2026

चल करूया नवीन सुरवात

Image
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात झाडी आहे घन दाट, त्याच डोंगर धारेवरती पाहात होतो तिची वाट. सह्याद्रीच्या या शांततेत ऐकू आली एक साद, नीट पाहिलं तर सोनकी ने दिली होती कारावी ला साथ. कडे कपारीतून ओहोळ आला झुळु झुळू वाहत, ओहोळच्या बाजूला शिंपले होते फारच छान. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळुकेने त्याला दिली साथ, बघता बघता कड्यावर ढगांची गर्दी झाली दाट. ढगांच्या या गर्दी ला सुर्य किरणांनी दिली अनोखी साथ, सहज कड्यावरून खाली पाहताच इंद्रवज्र पाहत होते वाट. शिंपल्याने सुद्धा सोडली मोत्याची साथ, पण तेव्हाच धरला तिने माझा हात आणि बोलली चल करूया नवीन सुरवात. © सौरभ अग्निहोत्री.