Posts

Showing posts from October, 2024

पुण्याहून कसे जाल मोहन दुर्गावर

Image
नमस्कार मित्रांनो, सिंदोळा नंतर पुढचा कोणता किल्ला करायचा हे मनात चक्र चालूच होते पण नक्की कोणता करावा पर्वत गड उर्फ हडसर की मोहन दुर्ग? ईद आणि गणपती अश्या सुट्ट्या सलग आल्या मुळे मी घरात थांबणार नव्हतो हे तर निश्चित होते. म नक्की कुठे जायचं आधी नचिकेत आणि रोहन यांना विचारलं होत माण देशातील किल्ले करूयात पण दोघेही गणपती मध्ये बाहेर नाही येणार बोलले होते. म काय अजून एक दोन जणांना विचारलं होत. पण ते ही नाही बोलले होते. शेवटी पुतण्या आणि एक दोन जण घेऊन राजगड करायचा निर्णय केला होता. पण आदेश ची सोमवार ची सुट्टी अचानक रद्द झाल्याने तो पण प्लॅन बदलून म फक्त एक दिवसात मोहनदुर्ग करायचा नक्की केलं. आणि आमचे पुतणे रद्द झाले. १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ६ वाजता स्वारगेट येथे जमणार होतो. आदल्या दिवशी रात्री अचानक अथर्व वडके उर्फ जाड्या न आदित्य करडे उर्फ काळ्या कपाळाचा माणूस तयार झाले. पण अथर्व ला कसे एकदम सगळ रॉयल लागते त्यामुळे त्याने मला फोन केला आणि बोलला "काय अहो सौ बस कशाला गाडी ने जाऊ की!" मी थेट नाही बोललो त्याला आणि भाऊ जरा नाराज झाले पण तरीही गडावर येयला तयार झाले. म आदेश ला

स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची

Image
वाट पाहत होतो तिच्या येण्याची, स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची. सह्याद्री ने नेसली होती हिरवी साडी, कारवी सुध्दा पायघड्यां साठी तयार होती. सोनेरी अशी कांती तिची, त्यापुढे सोनकी सुध्दा दिसे साधी. मृग नयनी डोळे तिचे, साऱ्यांचेच लक्ष वेधी, हास्य तिचे असे जणु झऱ्यांचे मंजुळ गाणी. इतकं सगळ असूनही आहे ती साधी, माहिती नाही आता ती परत भेटणार आहे कधी. वाट पाहत होतो तिच्या येण्याची, स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची.