स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची

वाट पाहत होतो तिच्या येण्याची,
स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची.

सह्याद्री ने नेसली होती हिरवी साडी,
कारवी सुध्दा पायघड्यां साठी तयार होती.

सोनेरी अशी कांती तिची,
त्यापुढे सोनकी सुध्दा दिसे साधी.

मृग नयनी डोळे तिचे, साऱ्यांचेच लक्ष वेधी,
हास्य तिचे असे जणु झऱ्यांचे मंजुळ गाणी.

इतकं सगळ असूनही आहे ती साधी,
माहिती नाही आता ती परत भेटणार आहे कधी.

वाट पाहत होतो तिच्या येण्याची,
स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची.

Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

स्मित हास्य तिचे खुलले

How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)