How to Reach KalavantinDurga Fort or PrabalGad Fort From Pune (कसे जाल कलावंतीण दुर्ग किंवा प्रबळगडावर)
कलावंतीण आणि प्रबळगड हे जोड किल्ले आहेत प्रबळ माची हि ह्या दोन किल्ल्यांना वेग वेगळ करते. कलावंतीण हा एक सुळका आहे आणि अंदाजे महाराजांच्या काळी टेहळणी साठी वापर होत असेल अस वाटत. तर प्रबळगड आकाराने बराच मोठा तसेच उंचीने सुद्धा कलावंतीण पेक्षा उंच आहे. प्रबळगडावर आपल्याला फिरायला देखील बरच आहे मात्र कलावंतीण हा सुळका असल्या मुळे फिरता येत नाही पण बर्याच गिर्यारोहकांचे स्वप्ना असते कि ह्या किल्ल्यावर जावे. प्रबळगडावरून आपल्याला कलावंतीण चे दृश्य अगदी नीट पाहता येते. तसेच कलावंतीण चे खास आकर्षण असणाऱ्या सह्याद्री मधल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या देखील एकदम नीट दिसतात. पावसाळ्या मध्ये कलावंतीण चा सुळका बऱ्याच वेळेला ढगातच असतो आणि बराच भाग ओला असल्यामुळे घसरडा देखील असतो. ठाकूरवाडी हे पायथ्याचे गाव असून पनवेल पासून एस.टी. ने अर्ध्याच तासात पोहोचतो.
कलावंतीण दुर्ग ह्या किल्ल्यावर जाण्याची ईच्छा अनेक दिवसांपासून होती पण काही मुहूर्त लागेना आणि एकदा नाही हो करता करता तो दिवस ठरला १२ फेब्रुवारी २०१७. म्हणजे १२ तारखेला काहीही झाल तरीही मी एकटा का होईना जाणारच होतो आणि तशी मनाची तयारी पण केली होती पण अचानक रात्री १२ च्या दरम्यान केतन चा मेसेज आला उद्याच काय जायचय ना किल्ल्यावर?? कधी निगयचं आणि कुठ जमायचं अस पण विचारल. मला वाटल पण नव्हत तो येईल पण चला सोबत मिळाली. मी माझ जे नक्की केल होत तसं सांगितलं त्याला. दुसर्या दिवशी सकाळी ७:५० ची प्रगती एक्सप्रेस होती पुणे रेल्वे स्थानकावरून होती. त्या नुसार आम्ही घरातून निघालो सकाळी ७ वाजता पण जेव्हा केतन भेटला तेव्हा तो मला म्हणाला अरे प्रतिक पण येणारे त्याला घेऊन जाऊ. मग झापाझाप पाउल टाकत त्याच्या घराखाली पोहचलो आणि त्याला फोन लावला आधी त्यानी काही उचललाच नाही मग आम्ही वैतागलो म्हंटल आता शेवटचा प्रयत्न करू आणि निघू. फोन लावला आणि उचलला पण फक्त तेच्या बाबांनी. मग काय त्यांनी अस सांगितल कि तो गेला आहे अंघोळीला. आत्तापर्यंत ७:३० वाजले होते मग म्हंटल आता आपण थांबलो कि आपल्याला पण जाता नाही येणार. मग तसेच आम्ही निघालो थोड पुढे येताच प्रतिक चा फोन आला गेलात का म्हणून. तर तेला आम्ही म्हंटल पळत येणार अशील तर पटकन ये नाहीतर आम्ही निघालो. तो म्हणाला आलोच आणि खरच पुढच्या अवघ्या काही मिनटात तो आला. म आम्ही रिक्षा केली आणि थेट पुणे स्टेशन गाठले. तिकीट काढले आणि रेल्वे लागलेलीच होती, धावत पळत गेलो गाडी मिळाली पण बसायला काही जागा मिळाली नाही मग काय दोन डबे जोडतात तिथे जाऊन थांबलो. आणि लगेच गाडी निघाली.
आता आमचा खर्या अर्थाने कलावंतीण च्या दिशेने प्रवास चालू झाला होता. मग काय पनवेल ला पोहचे पर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. अखेर पनवेल रेल्वे स्थानकात पोहचलो तरी तेव्हा सकाळचे १०:०० वाजले होते. तिथून बाहेर पडलो पण पुढे ठाकूरवाडी ला बस नि जायचं हे माहित होत पण बस कुठून मिळते हे कुठ माहित होत. मग काय केतन आणि प्रतिक ला म्हंटल थांबा जरा मी विचारपूस करून येतो. मग दोन चार जणांना विचारल्या वर कळाल कि स्थानकाच्या बाहेर पडल कि उजव्या हाताला वाळूउन थोड्या अंतरावर पनवेल बस स्थानक आहे तिथून कदाचित बस मिळेल अस कळाल मग काय तिथून थेट पनवेल बस स्थानक गाठल अगदी ५ मिनिटात पोहचलो. मग तिथे चौकशी केली मग कळाल कि दुपारी ११:०० वाजता बस येणार आहे. तोवर म माझ्या आई ने कांदे पोहे दिले होते ते खाल्ले पाणी भरून घेतल आणि बरोबर वेळेत बस आली.
बस मध्ये फारशी गर्दी नव्हती पण बस भरली आहे अस म्हणायला पण हरकत नव्हती. मग काय परात गप्पा चालू झाल्या होत्या. अवघ्या अर्ध्या तासात आम्ही ठाकूरवाडी पर्यंत पोहचलो. तो पर्यंत बर पूर्ण रिकामी झाली होती आम्ही ३ घे च बस मध्ये होतो. तो अनुभव एक वेगळाच होता जणू महाराष्ट्र सरकारनी फक्त आमच्या ३ घानसाठीच ती बस सोडली असल्यासारखे वाटले. पण आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण लगेचच आमचा बस स्थानक आले आणि आम्हाला ठाकूरवाडी मध्ये सोडून निघून गेले.
आता आम्हाला नक्की कुठे जायचय हे दिसत होते पण कसे जायचे कलावंतीण पर्यंत हे काही माहित नव्हते.
मग तिथेच एक दोघांना विचरल आणि त्यांनी सांगितलं सुद्धा, त्याच प्रमाणे आम्ही चालायला सुरवात केली होती. आता साधारण दुपारचे १२ वाजत होते. फेब्रुवारी महिना असल्यामुळे सूर्य तेचे काम अगदी नीट करत होता अगदी कुठे सुद्धा दिरंगाई करत नव्हता (: (: . ह्याच गोष्टीचा आम्हाला थोडा त्रास होत होता पण आमच्या तिघांचे नक्की होते कि काही पण झाले तरीही आज कलावंतीण पाहूनच घरी जायचं. आजून थोडे पुढे गेल्यावर लक्ष्यात आल कि ह्या ठिकाणी येणारे आपण एकटेच नाही अनेक गाड्या तिथे लावल्या होत्या तरी अंदाजे १०० तरी असतील. तो पर्यंत असा गोड समज होता कि फक्त काहीच जणांना ह्या किल्ल्या बद्दल माहित आहे म्हणून. हळू हळू आम्ही पुढे जात होतो गप्पा, जोक्स एकमेकांना सांगत इतक्या रणराणत्या उन्हात एकमेकांना उत्साह देत एक एक पाऊल किल्ल्या च्या दिशेने टाकत होतो. पण अगदी थोड्याच वेळानी आम्हाला काही जण किल्ला उतरून खाली येत होते. आता अस ३-४ वेळा झाल होत जो जो आम्हाला पाहत होता तो काही वेगळ्याच नजरेन पाहत होता. सुरवातीला काही कळाल नाही पण नंतर माझ्याच लक्ष्यात आल कि अरे ईतक उन आणि आत्ता हे चढाई करणार कुठून आलेत हे येडे आहेत का काय इतक्या उन्हाच कोण जात होय वरती.असा विचार माझ्या मनात येऊन गेला आणि पटला देखील कारण ते सगळे सकाळी लवकर किवा आदल्या दिवशी रात्रीच येऊन पायथ्याला थांबले असावेत. तरी आम्ही काही हार मानण्यातले नाहतो सावली ला थांबत आणि मग पुढे जात. आमच्या तिघात मिळून एकच पाण्याची बाटली होती आणि ती पण अर्धा लिटर ची. कशी पुरणार मग थोड स चालत गेल्यावर अगदी काही घराचं एक गाव आहे तिथून एक पाण्याची बाटली घेतली तेव्हा अस वाटल कि चला आता काही अडचण नाही येणार पण कसलं काय आम्हाला इतकी तहान लागली होती कि बस थोड थोड करत ती बाटली तिथेच संपली. आम्ही तिथेच गोळ्या पण घेतल्या होत्या. मग काय थोड दमलो कि एक गोळी खायची न पुढे जायचं. अस करत करत आता दुपारचे पावणे दोन वाजले होते तेव्हा आम्ही किल्याच्या मुख्य चढाई पर्यंत येऊन पोहचलो होतो. तिथे धरायला अशी व्यवस्थित अशी जागा नव्हती काळ्या कातळामध्ये जिथे जागा मिळेल तिथे हात आणि पाय ठेवायचे आणि पुढे जायचं. दिसायला भारी आणि करायला पण भारी वाटणार हे आमच्या आवडीच काम ह्या उन्हामुळे अवघड झाल झाल होत. सह्याद्री चा हा कातळ उन्हामुळे मस्त तापला होता आणि आम्ही चढाई करताना हाताचा वापर झाला कि मस्त चटके लागत होते. काही जागा तर अश्या आहेत कि कस बस उभं राहता येत होत. थोड स अजून वर गेल कि कलावंतीण च्या कातळामध्ये कोरलेल्या त्या पायर्या चालू होतात. त्या दिसायला जरी छान असल्या तरी चढायला अवघड. आता तुम्ही म्हणाल पायऱ्याच ना त्या म त्यात काय अवघड??? त्या समोरून पायऱ्या पण मागे पूर्ण दरी. आणि ह्या पायऱ्या देखील घाटा प्रमाणे गोल फिरून वर गेल्या आहेत त्या पण असल्या भारी वळणावरची पायरी पुढे थेट दरीच. पण अगदी १५ च मिनिटां मध्ये आम्ही हि चढाई पूर्ण केली आणि एकदम शेवटचा टप्पा. अंदाजे ३५ फूट उंच अश्या कड्याच्या पायच्या पर्यंत थांबलो. आता साधारण दुपारचे २ वाजले होते. पण काही वेळानी अस वाटल कि अरे उगाच इथे थांबलो कारण शिखरावर एक ग्रुप आधीच होता. आम्ही विचार केला म्हंटल ते खाली येतील सगळे मग आपण वर जाऊ. कसल काय आणि कसलं काय आम्ही जवळ जवळ अर्धा तास थांबलो तरी तेंचे लोक काही संपेना शेवटी आम्ही अडीच ला शेवटचा टप्पा चढायला सुरवात केली कडे कडेनी ते काही आम्हाला जागा देत नव्हते पण एका टप्प्या नंतर आम्ही तेंची पण कोंडी केली तेव्हा थोडस बाजूला होऊन आम्हाला वर जाऊ दिल. आणि अखेर आम्ही त्या उंच शिखरावरती पोहचलो होतो.मग वरून जेवढ्या दूर नजर जाईल तेवढ्या दूर पाहत होतो. दोन मिनिटांनी तिथेच एक खडक होता दुपारी ३:३० पर्यंत मग तसेच तिथे बसून होतो. आणि मग परतीचा प्रवास चालू केला. पायथ्याला येयला पण आम्हाला अडीच तास लागले. ठाकूरवाडी मध्ये पोहचल्यावर अस कळाल कि पुढची बस आता संध्याकाळी ७:०० वाजताच आहे मग काय तिथे तोंड हात पाय धुतले आणि गाडी ची वाट पाहू लागलो. वेळेत गाडी आली. साधारण संध्याकळी ७:३० ला आम्ही पनवेल बस स्थानकात पोहचलो. तिथून कोणताही वेळ न घालवता थेट रेल्वे स्थानकाकडे गेलो रेल्वे ची चौकशी केली. तीची वेळ एक तासांनी म्हणजे रात्री ८:३० ला होती. मग वडा पाव पोटा मध्ये ढकलला आणि रेल्वे ची वाट पाहू लागलो. रेल्वे पण वेळेत आली आणि आम्ही पुण्या मध्ये साधारण रात्री १०:३० पर्यंत पोहचलो होतो.
अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे ते पनवेल एक्स्प्रेस ७०/-
पनवेल ते ठाकूरवाडी बस १८/-
एकूण खर्च ८८/-
परतीचा एकाचा खर्च :
ठाकूरवाडी ते पनवेल १८/-
पनवेल ते पुणे ५५/-
एकूण खर्च ७३/-
***काही महत्वाच्या गोष्टी ***
जरका आपल्याला प्रबळगडावर जायचे असल्यास माची वरून उजवी कडे जावे, आणि डावी कडे कलावंतीण कडे मार्ग जातो.
ज्याला उंची ची भीती आहे त्यांनी शक्यतो इथे येणे टाळावे.
किल्ला चढाई ला अवघड नसला तरी किल्ल्यावरचा शेवटचा भाग अत्यंत आवघड आहेत.
उन्हाळ्यात पाणी कमी असते बर्याचदा नसते.
किल्ल्यावर राहण्यास जागा नाही. गावामध्ये राहण्याची व भोजनाची सोय होऊ शकते.
शक्यतो जुन ते जानेवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.
Comments
Post a Comment