Posts

मनातील सिंहगड

Image
मेट्रो मधुन प्रवास करताना दिसते सह्याद्रीची डोंगर रांग, सिंहगडा अरे किती आठवणी आहेत तुझ्या हे तुच मला सांग. कामाच्या व्यापामुळे डोक्यामध्ये असतो नुसता ताण, मेट्रो मधुन घरी जाताना, पाहता तुज हरपते माझे भान. सह्य भटक्यांच्या मनात आहे तुझ्या साठी आहे कायम आदराचे स्थान, स्वराज्य राखण्यासाठी तान्हाजीरावांनी दिल स्वतःच बलिदान. तुझा इतिहास आठवताच उंच होते अभिमाने मान. थोर इतिहास कार, शाहीर मावळे गाती तुझे शौर्य गान. सर्व ट्रेकर मंडळींना कायम घालितो तु साद, म्हणुनच तु घरं केलं आहेस आमच्या सर्वांच्या हृदयात. © सौरभ अग्निहोत्री.

स्मित हास्य तिचे खुलले

Image
पाहुनी गुलाब पुष्प, स्मित हास्य तिचे खुलले, मृग नक्षत्रातील सरींनी, सह्याद्रीतील डोंगर–दऱ्या, हीरवाई न बहरले. मनमोहक अशा वातावरणात दोघांतील प्रेम देखील बहरले, त्या दोघांचे प्रेम पाहून, गुलाब पुष्प देखील लाजले. खळखळणारे झरे देखील जागीच थबकले, मदनाच्या वाऱ्याने ढग सुद्धा सरले. जिथे फुलांचे गंधही तिच्यासाठी थांबून राहिले, तिच्या प्रत्येक नजरेत एक अव्यक्त गूज होते दडले. ओलसर मातीच्या दरवळात तिच्या आठवणी रुजल्या, पावसाच्या सरींमध्ये शब्दही नकळत भिजून गेले. त्या धुके छादीत डोंगरावर आम्ही आपली स्वप्ने रेखाटली, एकमेकांच्या नजरेतच आमची सगळी दुनिया सामावली.

रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला,

Image
रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला. मी निघालो होतो तिच्या भेटीला, जुन्या भेटींच्या आठवणी त्या प्रितीच्या. क्षणात चेहरा तिचा मनी माझ्या अवतरला, गळयात माळा तिच्या मोत्यांच्या. केसात मोगऱ्याच्या माळा गुंफलेल्या, साडीचा रंग तिचा निळ्या शार आकाशाचा. गालांवर तिच्या जणु गुलाबाचा रंग उतरलेला, कोमल अश्या स्वरांनी तिच्या मी मात्र घायाळ झालेला. स्पर्श होता तिचा माझ्या अंगाला, शहारा येई माझ्या अंगाला. रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला.

हित गूज

Image
आज तिची अचानक भेट झाली, बोलण्याची उत्सुकता दोघांची होती. त्याला काही सांगायचे होते, तिलाही त्याचे ऐकायचे होते. हित गूज चालु होताच, सारे काही हळु हळू धुसर होत गेले. कारण शब्द त्याचे होते, अश्रु तिचे होते. भावना दोघात होत्या पण, व्यक्त मात्र तिलाच करता आल्या. फुलांच्या कळ्या उमलण्या अधिच गळून पडल्या, निर्णय तिने घेतले, वेदना त्याच्या हृदयात झाल्या. तिचे प्रेम होते, दुःख मात्र त्याला झाले. आज तिची अचानक भेट झाली, बोलण्याची उत्सुकता दोघांची होती.

सुर तिचे

Image
मधुर शब्दांचे सुर होते तिचे, कर्ण पटल मंत्र मुग्ध होते माझे. नयनात तिच्या अचानक अश्रु दिसे, मला गमवायची भिती तिला वाटे. नाजुक क्षणाचा प्रसंग तिच्या नजरे समोर दिसे, नजरेस नजर भिडता मी तिचे डोळे वाचे. प्रत्येक भेटींची आठवण मनात कल्लोळ करे, प्रत्येक भेटीत ती माझ्या नव्याने प्रेमात पडे. प्रभात समई अंगणी प्राजक्ताचे सडे पडे, आठवणीत एकमेकांच्या नयनात चटकन अश्रु पडे. कुठेही नजर जाता मला मात्र तिच दिसे, प्रत्यक्ष भेट होताच ती माझ्या मिठीत पडे.

पुण्याहून कसे जाल मोहन दुर्गावर

Image
नमस्कार मित्रांनो, सिंदोळा नंतर पुढचा कोणता किल्ला करायचा हे मनात चक्र चालूच होते पण नक्की कोणता करावा पर्वत गड उर्फ हडसर की मोहन दुर्ग? ईद आणि गणपती अश्या सुट्ट्या सलग आल्या मुळे मी घरात थांबणार नव्हतो हे तर निश्चित होते. म नक्की कुठे जायचं आधी नचिकेत आणि रोहन यांना विचारलं होत माण देशातील किल्ले करूयात पण दोघेही गणपती मध्ये बाहेर नाही येणार बोलले होते. म काय अजून एक दोन जणांना विचारलं होत. पण ते ही नाही बोलले होते. शेवटी पुतण्या आणि एक दोन जण घेऊन राजगड करायचा निर्णय केला होता. पण आदेश ची सोमवार ची सुट्टी अचानक रद्द झाल्याने तो पण प्लॅन बदलून म फक्त एक दिवसात मोहनदुर्ग करायचा नक्की केलं. आणि आमचे पुतणे रद्द झाले. १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ६ वाजता स्वारगेट येथे जमणार होतो. आदल्या दिवशी रात्री अचानक अथर्व वडके उर्फ जाड्या न आदित्य करडे उर्फ काळ्या कपाळाचा माणूस तयार झाले. पण अथर्व ला कसे एकदम सगळ रॉयल लागते त्यामुळे त्याने मला फोन केला आणि बोलला "काय अहो सौ बस कशाला गाडी ने जाऊ की!" मी थेट नाही बोललो त्याला आणि भाऊ जरा नाराज झाले पण तरीही गडावर येयला तयार झाले. म आदेश ला ...

स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची

Image
वाट पाहत होतो तिच्या येण्याची, स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची. सह्याद्री ने नेसली होती हिरवी साडी, कारवी सुध्दा पायघड्यां साठी तयार होती. सोनेरी अशी कांती तिची, त्यापुढे सोनकी सुध्दा दिसे साधी. मृग नयनी डोळे तिचे, साऱ्यांचेच लक्ष वेधी, हास्य तिचे असे जणु झऱ्यांचे मंजुळ गाणी. इतकं सगळ असूनही आहे ती साधी, माहिती नाही आता ती परत भेटणार आहे कधी. वाट पाहत होतो तिच्या येण्याची, स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची.