सुर तिचे



मधुर शब्दांचे सुर होते तिचे,
कर्ण पटल मंत्र मुग्ध होते माझे.

नयनात तिच्या अचानक अश्रु दिसे,
मला गमवायची भिती तिला वाटे.

नाजुक क्षणाचा प्रसंग तिच्या नजरे समोर दिसे,
नजरेस नजर भिडता मी तिचे डोळे वाचे.

प्रत्येक भेटींची आठवण मनात कल्लोळ करे,
प्रत्येक भेटीत ती माझ्या नव्याने प्रेमात पडे.

प्रभात समई अंगणी प्राजक्ताचे सडे पडे,
आठवणीत एकमेकांच्या नयनात चटकन अश्रु पडे.

कुठेही नजर जाता मला मात्र तिच दिसे,
प्रत्यक्ष भेट होताच ती माझ्या मिठीत पडे.

Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

माहिती होत ती बोलणार नाही काही