How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )
राजगड हा किल्ला पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर आहे. गुंजवणी गाव हे पायथ्याच गाव आहे. राजगडला मुरुंबदेवाचा डोंगर असेही म्हणतात. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय महत्वाचा होता कारण ह्या किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी कोणती ना कोणती नदी पार करूनच पोहोचावे लागत होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी केली होती. मी बऱ्याच वेळा राजगडावर गेलो होतो. पण आमच्या वाड्या मधले माझे ३ मित्र ह्या किल्ल्यावर कधीच गेले नव्हते. आणि मी असाच एकदा ऑफिस मधून घरी आलो आणि सगळे मित्र कट्यावर बसून चर्चा करत होते तितक्यात मी तिथे पोहचलो, मी त्यांना काही विचारायच्या आधीच त्यांनी मला विचारले अरे राजगडावर जायचय येणार का??? मी पटकन हो म्हंटल त्यांना ते कळलाच नाही. कारण नेहमी मला बाहेर कुठे येणार का म्हणून विचारल तर मी नेहमी त्यांना काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचो. ते खूप खुश झाले. लगेच म तारीख ठरवून टाकली ४ आणि ५ जुन २०१६. म फुल चर्चा चालू झाली कधी निघायचं त्या दिवशी?? काय काय घ्याव लागेल?? मी पण त्यांना सांगत होतो. ठरल्या प्रमाणे आम...
Comments
Post a Comment