How to Reach Rajmachi Fort From Pune (कसे जाल राजमाची किल्ल्यावर)
राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.
तसा मी राजमाची ला ३ वेळा जाऊन आलेलो आहे. पण १८/३/२०१७ ला रात्री साधारण ११:३० ला ठरल उद्या राजमाची ला जायचं म्हणून ठरल तेव्हा आम्ही ३ जण होतो मी, शुभम आणि सचिन. पण अचानक काही कारणामुळे सचिन ला जमल नाही दुसऱ्या दिवशी. मला अस वाटत होत कि सकाळी लवकर निघावं म्हणजे जास्त उन होणार नाही पण शुभम ची दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यामुळे आम्हाला उशिरा निघावं लागणार होत आणि मला मनातल्या मनात वाटत होत कि आता आपल्याला उन्हामुळे खूप त्रास होणार वगरे वगरे. पण शुभम त्याची परीक्षा संपून सकाळी ८:५० ला साधारण घरी आला. मी त्याला म्हंटल अरे चाल लगेच निघू कारण ९:०५ ला लोकल होती तो हो म्हंटला फक्त घरी जाऊन ब्याग ठेऊ आणि निघू. मी पण ठीक आहे म्हंटल पण आता खूप थोडा वेळ उरला होता म त्याला म्हंटल जाता जाता आकाश ला माझ्या घरी पाठव म्हणजे तो माझ्याकडे येईस्तोवर तू काहीतरी खाऊन घे म निघू. आणि त्यानी सांगितल्याप्रमाणे केल सुद्धा म आकाश आला आणि आम्ही शुभम कडे पोहचलो पण तोवर वेळ निघून गेली होती. लगेच पुढची गाडी कधी आहे ते पहिले तर पुढची गाडी सकाळी ९:५५ ला होती. आता तसा थोडा वेळ होता. मग काय शुभम ने सावकाश नाश्ता केला आणि मी पण थोडी त्याला मदत केली. आणि लगेच निघालो. आम्ही पुणे स्टेशन ला पोहचलो तोवर गाडी चा फलाट क्रमांक निश्चित झाला होता. लगेच तिकीट काढाल आणि गाडीची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळात गाडी आली आम्ही गाडीत बसलो. आणि तिच्या वेळेत ती निघाली.
साधारण आम्ही ११:२० ला लोणावळ्यात पोहचलो. तिथे १० मि. थांबलो आणि तुंगार्ली च्या दिशेने चालायला सुरवात केली. गप्पा मारत मारत आम्ही चालत होतो. उन होत कडक पण आमचा उत्चाह जास्त असल्या मुळे आम्हाला जाणवत नव्हत. साधारण १२:०० वाजता आम्ही तुंगार्ली गाव सोडल आणि पुढे राजमाची च्या दिशेने पाउल टाकत होतो. आता साधारण १:०० वाजत होता तेवढ्यात मागून एक ट्रक आला त्यांना विचारल सोडणार का ते म्हंटले मी शेवट पर्यंत नाहीये मला अलीकडेच थांबायचं आहे. आम्ही चालेले म्हंटल आणि ट्रक मध्ये चढलो. साधारण एक २० मि. झाल्यावर काकांनी गाडी थांबवली. म आम्ही उतरलो आणि परत चालायला सुरवात केली. थोड पुढ गेलो आणि बसलो. लोणावळ्यात आम्ही केळी घेतली होती २-२ खाली आणि परत पुढे निघालो. आता १:३० वाजले होते.
तरी अजून अर्धा तास पायपीट केल्यावर मागून एक चार चाकी येताना दिसली आम्ही थांबलो त्यांना काही वेगळाच वाटल असाव आम्हाला पाहताच त्यांनी गाडी हळू केली. आम्हाला वाटल हे काही आपल्याला लिफ्ट देणार नाहीत म आम्ही लक्ष ण देता परत चालायला सुरवातीला पण लगेचच ते पुढे आले आणि आमच्या बाजूला गाडी थांबवली. आम्हाला त्यांनी विचारला गावात चाललात ना?? आम्ही हो म्हणटलो आणि म त्यांच्या परवानगी ने गाडी मध्ये बसलो. आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला ते आमची विचारपूस करत होते त्या वरून अस लक्षात आल कि त्यांना अस वाटल कि आम्ही गावकरीच आहोत. म आम्ही त्यांचा गैरसमज दूर केला. आणि आता आम्ही तो गाडीतला सुखाचा प्रवास चालू झाला. बोलता बोलता हे लक्षात आल कि यांचा पूर्ण ग्रुप आलाय म्हणजे १ नाही २ नाही चक्क ४५ टाटा सफारी चा ताफा च होता. हा अनुभव आम्हाला नवीनच होता.
दुपारी साधारण २:१० वाजता आम्ही गावात पोहचलो. मग आम्ही वेग वेगळे झालो. आधी गावातल्या तलावा पाशी जाऊन आम्ही फ्रेश झालो.
आणि आता किल्ला पाहण्यास निघालो. त्या आधी काहीतरी खाव असा विचार केला. आणि म गावात एकानं विचारल तर त्यांचा जवळ जवळ सगळा स्वयंपाक संपला होता. मग काय त्यांनी विचारल म्यागी चालेल का?? मग काय दोघेही हो म्हणटलो बुडत्याला काडी चा आधार.
म्यागी खाऊन आम्ही किल्ला पाहायला निघालो. जाण्याच्या मार्गावर खूप सुधारणा केल्या आहेत. परिसराचा आढावा घेत आम्ही भैरोबाच्या मंदिरा पर्यंत पोहचलो.
हे पाहून आता आम्ही परततच होतो इतक्यात माझ्या आणि शुभम मध्ये चर्च्या चालू होती कि मनरंजन किल्ल्याच्या मध्यवर्ती एक टाक आहे म्हणून. तो म्हंटला आपण हे पाहूनच जायचं म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो पण ते आम्हाला काही लवकर सापडेना. म तिथून आम्ही श्रीवर्धन, ढाक आणि नागफणी चे दृश्य डोळ्यात साठवत होतो.
इतक्यात शुभम च लक्ष्य खाली वाटेकडे गेले आणि तो म्हंटला अरे त्या गाड्या निघाल्या आम्ही तसेच पळत थेट त्या गावाच्या वेशी पर्यंत पोहचलो. आणि आम्ही पाहतच होतो ज्या काकांनी आम्हाला येताना लिफ्ट दिली होती ते दिसत आहेत का, पण इतक्यात एका गाडीचा हॉर्न वाजला आणि आम्ही तिकडे पाहिलं तर तेच काका होते. म आम्ही परत त्यांची परवानगी घेऊन गाडी मध्ये बसलो. आणि आमचा राजमाची चा खडतर प्रवास आरम्दाई प्रवासा मध्ये रूपन्तरित झाला. काकांनी गाडी मध्ये मस्त गाणी लावली होती. त्यांची परवानगी घेऊन थोडे त्या राईड चे फोटो काढले.
त्या काकांनी आम्हाला इतकी मोठी लिफ्ट दिली कि थेट पुण्या मधेचे आणून सोडल म्हणजे त्यांना पण पुण्यातच येयच होत. आत्तापर्यंत पहिल्यांदा इतका सुखाचा ट्रेक अनुभवायला मिळाला.
अंदाजे जायचा खर्च एकाचा :पुणे ते लोणावळा १५/-
एकूण खर्च १५/-
परतीचा एकाचा खर्च :
लोणावळा ते पुणे १५/-
एकूण खर्च १५/-
***काही महत्वाच्या गोष्टी ***
किल्ला चढाई ला अवघड नसला तरी चालण्या साठी खूप अन्तर आहे म्हणजे १६ किलोमीटर.
ज्याला चालण्याची सवय नाही त्यांनी इथे येऊ नये कारण इथे दुसरा पर्यायच नाहीये.
उन्हाळ्यात पूर्ण रस्त्यात पाणी नसते.
राहण्याची व भोजनाची उत्तम सोय गावात होऊ शकते.
शक्यतो जुन ते जानेवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.
उन्हाळ्यात जाणार असाल तर रात्रीच जाणे करावे.
पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस असतो. काही ठिकाणी आपला पाय गुढग्या इतक्या चिखलात जाऊ शकतो.
योग्य वेळीस इथे आलात तर आपल्याला खूप प्रमाणात करवंद खाण्यास मिळतील.
Comments
Post a Comment