How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )




राजगड हा किल्ला पुण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर आहे. गुंजवणी गाव हे पायथ्याच गाव आहे. राजगडला मुरुंबदेवाचा डोंगर असेही म्हणतात. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय महत्वाचा होता कारण ह्या किल्ल्या पर्यंत पोहोचण्यासाठी कोणती ना कोणती नदी पार करूनच पोहोचावे लागत होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी केली होती.

मी बऱ्याच वेळा राजगडावर गेलो होतो. पण आमच्या वाड्या मधले माझे ३ मित्र ह्या किल्ल्यावर कधीच गेले नव्हते. आणि मी असाच एकदा ऑफिस मधून घरी आलो आणि सगळे मित्र कट्यावर बसून चर्चा करत होते तितक्यात मी तिथे पोहचलो, मी त्यांना काही विचारायच्या आधीच त्यांनी मला विचारले अरे राजगडावर जायचय येणार का??? मी पटकन हो म्हंटल त्यांना ते कळलाच नाही. कारण नेहमी मला बाहेर कुठे येणार का म्हणून विचारल तर मी नेहमी त्यांना काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचो. ते खूप खुश झाले. लगेच म तारीख ठरवून टाकली ४ आणि ५ जुन २०१६. म फुल चर्चा चालू झाली कधी निघायचं त्या दिवशी?? काय काय घ्याव लागेल?? मी पण त्यांना सांगत होतो.

ठरल्या प्रमाणे आम्ही मी, ऋषिकेश, निरंजन, भूषण आणि अभिजित असे आम्ही ५ जण, ४ तारखेला दुपारी घरून जेवण करून ११:३० वाजता निघालो स्वारगेट बस स्थानका कडे. तिथे गेल्यावर अस कळाल कि १२:३० ची गुंजवणे बस अर्ध्या तास उशिरा येणार आहे आणि ती त्या वेळेत आली आणि आमचा गुंजावाण्याच्या दिशेने प्रवास चालू झाला. पुण्याहून आपल्याला दोन मार्गाने राजगडावर जाता येत. पहिला गुंजवणे आणि दुसरा वाजेगर. दोन्ही बस स्वारगेट बस स्थानकातून साधारण २-२ तासांनी असतात. गुंजवणे गावातून आपण २ वाटेनी किल्ल्यावर पोहचू शकतो, चोर दरवाजा आणि गुंजवणे दरवाजा. वाजेगर मार्गाने आपण पाली दरवाजाने वर पोहोचतो. पाली दरवाज्याने पायऱ्या आहेत. आणि चोर दरवाजाने जायचं झाल्यास पाउल वाट आहे आणि शेवटच्या टप्प्या मध्ये ROCK PATCH आहेत तिथे नीट जाता याव म्हणून तिथे काही बाजूनी लोखंडी गज पण लावले आहेत. गुंजवणे दरवाज्या ची वाट अनेक वर्ष बंद होती. पण वन विभागाने विशेष प्रयत्न करून ती वाट गेल्या वर्षी चालू केली आहे. हि वाट खूप कमी जणांना माहित आहे, गुंजवणे दरवाज्याची वाट सुरवातीला सोप्पी वाटते पण शेवटच्या टप्प्यात जो ROCK PATCH आहे तो बराच अवघड आहे नवीन चढाई करणाऱ्यांसाठी. बरेच जण चोर दरवाज्यान जाण पसंत करतात. आम्ही पण तेच केल. आमची बस गुंजवणे गावात ३:०० वाजता पोहचली. म आम्ही तिथे एक तास असाच वेळ घालवला आणि ४:०० वाजता किल्ला चढायला सुरवात केली.

आम्ही रमत गमत किल्ल्यावर चढत होतो मध्ये मध्ये थांबून फोटो काढत होतो. उन्हाळा संपला होता आणि पावसाळी दिवस चालू होत होते, म्हणून वातावरण ढगाळ होत. त्यामुळे आम्हाला वर चढताना त्रास आजिबात झाला नाही. आम्ही संध्याकाळी ६:१५ -- ६:३० च्या बेतला किल्ल्यावर पोहचलो. खूप मस्त वातावरण होत. सगळ्यांना खूप छान वाटत होत.

मग आम्ही तिथे पद्मावती देवीच्या मंदिरात आमच्या बैग ठेवल्या. आणि आपल्या आपल्या मना प्रमाणे फक्त पद्मावती माची पाहायला गेलो. आणि अंधार जास्त वाढायला लागला तस आम्ही परत मंदिरात पोहचलो. आता मात्र मंदिर पूर्ण पर्यटकांनी भरल होत. जागा खूप कमी राहिली होती. आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला मंदिरात पुरेशी जागा मिळाली. आम्ही रात्रीच्या जेवणा साठी आम्ही घरून डबा आणला होता. मंदिरातच जेवण केल थोड्या गप्पा केल्या, वर चढताना आम्ही काही कैऱ्या थोड्ल्या होत्या त्या पण जेवण झाल्यावर फळ आहार म्हणून खाल्या आणि झोपी गेलो. किल्ल्यावरती सरकार तर्फे पर्यटक निवास देखील बांधण्यात आलेला आहे तुम्ही तिथे देखील राहू शकता. वरती मी उल्लेख केल्या प्रमाणे ढगाळ वातावरण त्यामुळे अगदी झोपायच्या वेळेला खूप जोराचा पाऊस चालू झाला. मंदिरात आणि पर्यटक निवासात जे जे थांबले होते ते सर्व नीट राहिले पण काही ग्रुप स्लीपिंग ब्याग घेऊन आले होते आणि सदर किवा गडावर बझार पेठ आहे त्या ठिकाणी रिकामी जागा होती तिथे ते झोपले पण जसा पाऊस चालू झाला तस त्यांना अवघड झाल कारण पाऊस खूप झोरात होता. म ते सुद्धा आश्रया साठी मंदिराकडे येऊ लागले पण ते तवर पूर्ण भिजले होते. मंदिरात आता अजिबात जागा नव्हती आणि मंदिराच्या बाजूनी देखील पर्यटकानी गर्दी केली होती. त्या दिवशी पूर्ण रात्र पाऊस चालू होता. त्यामुळे ज्याचं सरपण बाहेर होत ते पूर्ण ओल झाल होत. आणि आम्ही जे सरपण जमा केल होत ते मंदिरात आमच्या डोक्याशीच ठेऊन झोपलो होतो.

५ ताखेला साधारण पहाटे ५:०० वाजता उठलो आणि आम्ही कॉफी करायच्या मार्गाला लागलो. तरी पण पाऊस अजून थेंब थेंब चालूच होता त्यामुळे आमची चुल पेटतच नव्हती. म आम्ही एका आडोश्या ची जागा शोधली आणि आणि तिथे चूल पेटवली मग आमची ती कॉफी तयार झाली आणि ती इतकी जास्त झाली कि आम्ही प्रत्येकानी किमान ४-५ ग्लास प्यायलो. आणि साधारण सकाळी ६:०० ला किल्ला पाहायला सुरवात केली. ठरल्या प्रमाणे आधी आम्ही बालेकिल्ल्यावर जाण्यास सुरवात केली. रात्री खूप पाऊस झाल्यामुळे सर्वच जण झोपले होते आणि जे जागे होते ते हातच विचार आणि चर्चा करत होते खूप ओल असेल त्यामुळे घसरड झाल असेल म उजाडल कि म पाहूयात किल्ला पहायचा क नाही ते वगैरे वगैरे...

आम्ही ह्याच संधीचा फायदा घेऊन बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. किल्ला पहायचे एकूण चार टप्पे आहेत. बाले किल्ला, सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची,

आणि सकाळच्या मस्त वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही अगदी अर्ध्याच तासात वरती पोहचलो. सूर्य उदय अजून होयचा होता.
बालेकिल्ल्यावर आम्ही जवळ जवळ एक तास वेळ घालवला आणि फोटो काढले. आणि जितक ते दृश्य डोळ्यात साठवता येईल त्याचा प्रयत्न केला. सकाळच वातावरण चांगल असल्यामुळे वरून जेवढे किल्ले दिसले ते मित्रांना दाखवले आणि थोडी माहिती सांगितली.
वरील चित्र डावी कडे पद्मावती माची आणि सगळ्यात शेवटचा डोंगर सिंहगड.
वरील चित्र तोरणा.

मग आम्ही सुवेळा माची पाहण्यासाठी निघालो. सुवेळा माची चा आवर्जून पाहण्याचा भाग म्हणजे तटामधला गणपती आणि हती नेढ. हत्ती नेढ पाहण्या साठी जरा वर चढून जाव लागत. नवीन चढाई करणार्यान जपून जाव. ह्याच माची ला दुहेरी तटबंदी सुद्धा आहे. याचा अर्थ जरी तोफांचा मारा झाला तरी बाहेरील तटबंदी ढासळली तरी दुसरी तटबंदी संरक्षण करू शकते. मग आम्ही परतताना पाली दरवाजा आणि सुवेळा माची पहिली आणि परत मंदिरा मध्ये पोहचलो.

मग आम्ही मंदिरा मध्ये पोहचून पोट भर maggi चा नाश्ता केला आणि आवरून साधारण १०:३० च्या बेतला परतीच्या मार्गाला लागलो. इथे मात्र आमच्या मध्ये मत भेद झाले माझ आणि हृषीकेश चा म्हणण होत कि गुंजवणे दरवाज्याने उतरायचं पण अभिजित अस म्हणत होता जी वाट माहित आहे त्यांनीच जाऊयात नवीन नको काही करायला मग आम्ही वेग वेगळे झालो आणि मी आणि हृषीकेश गुंजवणे दरवाज्यानी आलो आणि भूषण, निरंजन, अभिजित चोर वाटे ने परतले. दोघाना खाली उतरायला १ तास लागला. पण आम्हाला एक नवीन वाट कळली.

मग आम्ही पायथ्या पासून नसरापूर फाट्या पर्यंत जीप ने आलो आणि मग तिथून बस नी स्वारगेट पर्यंत आलो. आणि मग तिथून घरी परतलो.

अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे(स्वारगेट) ते गुंजवणे ६५/-
एकूण खर्च ६५/-

परतीचा एकाचा खर्च :
गुंजवणे ते नसरापूर फाटा जीप ४०/-
नसरापूर फाटा ते पुणे ( स्वारगेट ) ३५/-
एकूण खर्च ७५/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
किल्ला चढाई ला अवघड नसला तरी किल्ल्यावरची काही ठिकाण आवघड आहेत. जपून पहा.
किल्ल्यावर राहण्यास जागा आहे मंदिरात २५-३० जण राहू शकतात. गावामध्ये राहण्याची व भोजनाची सोय होऊ शकते.
किल्ल्यावर सुद्धा भोजन मिळते.
किल्यावर एक माणूस कायम असतो आपली नोंदणी तेथे करणे गरजेचे असते.

Comments

  1. खूपच छान माहिती आपण दिली आहे। कारण मला देखील राजगड पाहायला जायचे आहे। धन्यवाद ����

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर माहिती

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती.... शिक्षक 🙏

    ReplyDelete
  4. खूपच छान माहिती दिलीस मित्रा.. धन्यवाद.. मला ह्या गडावर जायचे आहे.. खूप उपयुक्त आहे ही माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )

How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )