How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )

अनेक जणान कडून ऐकल होत कोरीगड खूप मस्त किल्ला आहे, सोप्पा आहे, किल्ल्यावर जायला पायऱ्या देखील आहेत. आणि महत्वाच म्हणजे लहान मुलांची म्हणजे १ ली ते ४ थी ची मुल सुद्धा ह्या किल्ल्यावर सहज जाऊ शकतात. माझे मित्र दोन वेळा ह्या किल्ल्यावर जाऊन आले पण मला त्या दोन्ही वेळेस जमल नव्हत. तेव्हाच मी ठरवल होत वेळ मिळाला कि नक्की ह्या किल्ल्यावर जायचं. पण कस जायचं कुठून बस पकडायची काहीच माहिती नव्हतं म जे मित्र जाऊन आले होते त्यांना विचारल होत आणि इंटरनेट वर पण शोधलं होत. नक्की आठवत नाही पण मे महिन्याच्या शेवटी किवा जून महिन्याच्या सुरवातीला अचानक ठरवलं दुपारी मी आणि माझा मित्र अनुराग त्याला घरातून उचलून घेऊन गेलो होतो साधारण दुपारी निघालो होतो. आणि लोणावळ्यात शिवाजी उद्यान पाशी साधारण संध्याकाळी ४ च्या बेतला पोहचलो. आणि तिथे चौकशी केली पण अस कळाल कि आता गावाच्या पायथ्या पर्यंत जाऊ शकतो आणि किल्ला पण पाहू शकतो पण परत लोणावळ्यात येयला वाहनाची सोय नसेल. म तिथूनच परत फिरलो पण आता माझी ईच्छा आजुनच वाढली होती आता त्या किल्ल्यावर जायची.... आणि एकदाच २३/०६/२०१६ ला रात्री तीन मित्रांना फोन केला आणि विच...