How to reach Korigad Fort from Pune ( कसे जाल कोरीगडावर )


अनेक जणान कडून ऐकल होत कोरीगड खूप मस्त किल्ला आहे, सोप्पा आहे, किल्ल्यावर जायला पायऱ्या देखील आहेत. आणि महत्वाच म्हणजे लहान मुलांची म्हणजे १ ली ते ४ थी ची मुल सुद्धा ह्या किल्ल्यावर सहज जाऊ शकतात.

माझे मित्र दोन वेळा ह्या किल्ल्यावर जाऊन आले पण मला त्या दोन्ही वेळेस जमल नव्हत. तेव्हाच मी ठरवल होत वेळ मिळाला कि नक्की ह्या किल्ल्यावर जायचं. पण कस जायचं कुठून बस पकडायची काहीच माहिती नव्हतं म जे मित्र जाऊन आले होते त्यांना विचारल होत आणि इंटरनेट वर पण शोधलं होत. नक्की आठवत नाही पण मे महिन्याच्या शेवटी किवा जून महिन्याच्या सुरवातीला अचानक ठरवलं दुपारी मी आणि माझा मित्र अनुराग त्याला घरातून उचलून घेऊन गेलो होतो साधारण दुपारी निघालो होतो. आणि लोणावळ्यात शिवाजी उद्यान पाशी साधारण संध्याकाळी ४ च्या बेतला पोहचलो. आणि तिथे चौकशी केली पण अस कळाल कि आता गावाच्या पायथ्या पर्यंत जाऊ शकतो आणि किल्ला पण पाहू शकतो पण परत लोणावळ्यात येयला वाहनाची सोय नसेल. म तिथूनच परत फिरलो पण आता माझी ईच्छा आजुनच वाढली होती आता त्या किल्ल्यावर जायची....
आणि एकदाच २३/०६/२०१६ ला रात्री तीन मित्रांना फोन केला आणि विचारल कि उद्या सकाळी येणार का कोरीगडावर?? मला खात्री नव्हती ते हो म्हणतील पण ते चक्क हो म्हंटले आणि ठरवलं कि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० ची लोकल पुणे रेल्वे स्थानकावरून पकडायची.

आणि ठरल्याप्रमाणे प्रमाणे मी,स्वरूप,दीपक, आणि धनंजय आम्ही पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ६:३० ची लोकल पकडून लोणावळ्याच्या दिशेने प्रवास चालू केला. आणि सकाळी साधारण ८:०० च्या दरम्यान आम्ही लोणावळ्यात पोहचलो. हे तिघेही माझ्या पेक्ष्या साधारण ७-८ वर्षांनी लहान. पण मी त्यांना सांगितल होत कि मी पण इथे कधी आलेलो नाहीये तर जे होईल ते पहायचं,आणि त्यांनी पण ते मान्य केल. म आम्ही लोणावळा रेल्वे स्थानकातून शिवाजी उद्यान पर्यंत चालत पोहचलो. तिथे चौकशी केली आंबे vally - पेठ शहापूर पाशी कोरीगडाला कसं जायचं?? तर स्थानिकांनी सांगितल आंबवणे किवा भांबुर्डे गावाची बस पकडायची आणि त्यांना सांगायचं कोरीगडावर जायचय बस थांबा आला कि सांगा तस ते सांगतात. पण ती बस सकाळी ९:०० वाजता असते आजून एक तास होता. मग एक तास शिवाजी उद्यान मध्ये वेळ घालवला.

आणि बस च्या वेळेत बस थांब्यावर आलो आणि वेळेत बस आली, आमचा प्रवास कोरीगडच्या दिशेने चालू झाला. जस बस मध्ये बसलो तसा पाऊस चालू झाला धुक येऊ लागल खूप मस्त वातावरण झाल होत. आम्ही अगदी अर्ध्याच तासात म्हणजे ९:३० वाजता किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत पोहचलो. बस थेट किल्ल्याच्या पायथ्या पाशीच थांबते. थोडा पाऊस धुकं त्यामुळे किल्ला आणि परिसर इतका मस्त दिसत होता ना कि बास नुस्त पाहवत राहव असच वाटत होत. ९:३० ते १०:०० आम्ही तिथेच वेळ घालवला.

आम्ही सकाळी १०:०० वाजता किल्ला चढायला सुरवात केली. सुरवातीला पाउल वाट आहे आणि मग पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून अर्ध्या वाटेत पोहचल्यावर आपल्याला वाटेत एक लेणी सारखी एक खोली लागते.

तिथेच दगडात मारुती व गणपती ची मूर्ती लागते. आणि पावसाच्या दिवसामध्ये किल्ल्यावरच साठलेलं किवा पावसाच पाणी कायम पायऱ्यांवरून वाहत असत.त्यामुळे आपला उत्साह आधिक वाढतो. १०:३० वाजता वर देखील पोहचलो. तेव्हा खूप खूप मस्त वाटल.
मग न थांबता किल्ला पाहायला सुरवात केली.किल्ल्याच्या बाजू बाजूनीच आम्ही किल्ला पहायचं ठरवलं
म्हणजे तटबंधी वरूनच आधी पहायचं आणि मग किल्ल्याची सखल बाजू पहायची म्हणजे कोराई देवीच मंदिर, शंकराचं मंदिर इ.
फिरता फिरता एका बुरुजावर बसूनच बरोबर डबा आणला होता तो तिथे खाल्ला. मग पुढे किल्ला पहायला सुरवात केली. आता पोट भरल होत आणि वातावरण पण मस्त होत. किल्ल्याच्या तटबंधीवरून आंबे vally चे विहंगम दृश्य पहावयास मिळत होते.
किल्ला तसा पाहायला खूप छान आहे. किल्ल्याची तटबंधी आजून पूर्ण शाबूत आहे. पण किल्ल्यावर दोन पाण्याचे टाके आहेत पावसाळ्यात ह्यात भरपूर पाणी असते. पाण्यात उतरणे धोक्याचे नाही तरी पण पाण्याचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरावे. किल्ल्यावर जुन्या ६ तोफा आहेत.
तसेच किल्ल्यावर येण्यास ३ वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला हा मार्ग सोपा आहे. इतर २ कठिण आहेत. जे अनुभवी आहेत त्यांनी त्या मार्गांनी येयला हरकत नाही. पण जरा जपूनच. २ मार्ग हे आंबे vally तून किल्ल्यावर येतात. किल्य्याला काही ठिकाणी चिलखती बुरूज अजून शाबूत आहेत. हे पाहून राजगडाची आठवण येते. किल्ल्यावर काही ठिकाणी फसव्या वाटा देखील आहेत. त्या थेट दरीत जातात. संपूर्ण किल्ला २-३ तासात पाहून होतो.

आम्ही साधारण दुपारी १:३० वाजता किल्ला उतरण्यास सुरवात केली आणि २:०० वाजता खाली परतलो. म भूक खूप लागली होती कारण आमच्या चार जणांमध्ये एकच डबा होता तो आम्हाला पुरेसा नव्हता मग पायथ्याला एक हॉटेल आहे तिथे मिसळ घेतली आणि परतीच्या गाडीची चौकशी देखील केली. अस कळाल कि गाडी आता ४:०० वाजता आहे. पण आम्ही गाडीची वाट न पाहता जीप ने परतलो लोणावळ्या पर्यंत. आणि मग लोणावळ्या पासून आम्ही ५:३० ची लोकल पकडून पुण्याकडे परतलो.

अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे ते लोणावळा लोकल १५/-
लोणावळा ते आंबवणे बस २५/-
एकूण खर्च ४०/-

परतीचा एकाचा खर्च :
आंबवणे ते लोणावळा जीप ३०/-
लोणावळा ते पुणे १५/-
एकूण खर्च ४५/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
किल्ला चढाई ला अवघड नसला तरी किल्ल्यावरची काही ठिकाण आवघड आहेत. जपून पहा.
उन्हाळ्यात पाणी कमी असते बर्याचदा नसते.
किल्ल्यावर राहण्यास जागा नाही. गावामध्ये राहण्याची व भोजनाची सोय होऊ शकते.
शक्यतो जुन ते फेब्रुवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

How to Reach Bhorgiri Fort to Bhimashankar From Pune ( कसे जाल भोरगिरी ते भीमाशंकर किल्ल्यावर )