आज ती खूप दिवसांनी स्वप्नात आली


आज ती खूप दिवसांनी स्वप्नात आली
असे वाटले कि हि मोगऱ्याची कळी फक्त माझ्यासाठीच उमलली.

चिंब भिजलेली, थंडीने गारठलेली, पण तरीही माझ्यावर रुसलेली.
थोडी शहारलेली, थोडी घाबरलेली, पण नजरेस नजर भिडवून डोळ्यांनेच बोलणारी.
हळूच लाजणारी अन गालातल्या गालात हसणारी पण अजूनही हिरमुसलेली.
घाबरत घाबरत हातात हात घेणारी, गोड गोड आवाजात बोलणारी.

पण स्वप्नात सुद्धा अशी काही झलक देऊन गेली
कि जाता जाता तिची अजून एक कायमची आठवण मनात ठेऊन गेली.


Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

माहिती होत ती बोलणार नाही काही