Skip to main content
परत एकदा ......
परत एकदा त्या संध्याकाळ ची वाट पहायचीये
परत एकदा त्या बागेतल्या बाकावर बसायचय
परत एकदा त्या वातावरणाचा आस्वाद घेयचाय
परत एकदा त्या वातावरणात तिची वाट पहायचीये
परत एकदा तिला सावकाश येताना पहायचंय
परत एकदा हळुवार वऱ्या नी उडणारे तिचे केस पहायचे आहेत
परत एकदा तिचा हसरा चेहरा पहायचाय
परत एकदा तिला असाच जवळ आलेल पहायचंय
परत एकदा तिने माझ्या जवळ येताच विचाराव "कधी आलास"??परत एकदा तिला शेजारी बसताना हळूच पहायचंय
परत एकदा तिच्याशी बोलता बोलता तिच्याच नजरेत हरवून जायचंय
परत एकदा नजरेत हरवून जाईपर्यंत तिचे ते शब्द ऐकू येतात"चल खूप वेळ झाला उशीर होतोय".....
परत एकदा तिला जाता जाता थांबवायचंय
परत एकदा तिची वाट पहात त्या बाकावर बसायचंय
परत एकदा तिची वाट पहात त्या बाकावर बसायचंय.........
Comments
Post a Comment