ती राहणार नव्हती माझी
उन्हाळ्याचे दिवस होते, संध्याकाळ होत होती
झाडांची पान गळती चालू होती, अलगद वाऱ्याची झुळझुळ पण चालू होती
ह्या सगळ्या वातावरणात आमची भेट निश्चित होती.
उत्सुकता होती आता ती दिसण्याची आणि तिच्या गालावरच्या लाजत स्मित हास्याची
मी आणलेल्या गुलाबाच्या फुलाला आस होती तिच्या कोमल हाताच्या स्पर्शाची
आतुरता होती तिचा मधुर आवाज कानावर पडायची
अजूनही मी वाट पहात होतो ती तिथे येयची
पण मला हे ठाऊक नव्हतं आज पासून ती राहणार नव्हती माझी...
Comments
Post a Comment