खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही

खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही । धन, धान्य, पशु, पक्षी, सर्वच प्राणी मात्रांची चांगलीच होती नांदी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अनेक आक्रमण पाहिले आम्ही । अनेक लढाया आणि महा पराक्रमी सुद्धा पाहिले आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। अचानकच मोठी टोळी आली गोरी । उध्वस्त केले सारे काही । मग काही काळ निपचित पडलो आम्ही । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। पुन्हा काही रांगड्या सवंगड्यांची आली टोळी । पुन्हा नव्याने समृद्ध होण्याची दिली संधी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। परत पूर्वीच्या समृद्धी ची आठवण हळू हळू होत होती । ह्यातच आली मोठी महामारी । तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।। महामारी मुळे पुन्हा उध्वस्त होऊ का आम्ही?? तरीही, खूप वर्षांपूर्वी समृद्ध होतो आम्ही ।।