How to Reach Kenjalgad Fort from Pune ( कसे जाल केंजळगडावर )
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. इ.सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते. मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ मध्ये किल्ला मराठ्यांनी जिंकला. पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठ्यांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.
मित्रानो तुम्हला तर माहितच आहे नव नवीन किल्ल्यांवर जाण हे तर मला आवडत. ह्या किल्ल्याची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवायला जरा उशीरच झाला आहे. त्या बद्दल माफी असावी. असो, सगळ्यांच्या घरी गणपती आले होते गौरी जेवतात तो दिवस होता(१६/०९/२०१८). आमचे घर लहान आणि त्यात पाहुणे येणार अस कळाल. मग काय मनात ठरवलं इंटरनेट वरून माहिती मिळवली आणि सकाळी ५:३० वाजता घर सोडल. मंडई पर्यंत चालत गेलो आणि तेथून रिक्षेनी स्वारगेट ला गेलो. भोर च्या बस ची चौकशी केली, साधारण १० मिनिटांत बस आली आणि खऱ्या अर्थाने केंजळगडाच्या दिशेने माझा प्रवास चालू झाला.
साधारण दोन तासाच्या प्रवासा नंतर मी भोर च्या बस स्थानकात पोहचलो. तिथे कोर्ले ह्या बस ची चौकशी केली, ती गाडी येयला एक तास होता. आधी न्याहरी केली म तिथेच टंगळ-मंगळ केली आणि बरोबर वेळेत म्हणजे ९:०० वाजता कोर्ले गावची गाडी आली, आणि माझा पुढचा प्रवास चालू झाला. साधारण सव्वा तासात मी पायथ्याच्या गावात पोहचलो. आणि चालायला सुरवात केली. सकाळचे १०:१५ वाजत होते. बस थांब्या पासून एक वाट रायरेश्वर किल्ल्यावर जाते तर डावी कडची वाट आपल्याला केंजळगडावर घेऊन जाते. डाव्या हाताच्या रस्त्याने साधारण १० मिनिट चालत पक्क्या रस्त्याने चालत गेल्यास आपल्याला पाऊल वाट लागते ह्या वाटेने आणि थोडे पुढे गेल्यास एक वस्ती लागते. छोटा पाडा च हा अगदी मोजकी म्हणजे ५ ते ७ घर आहेत ह्या सपाटी वर. ह्याला सात खोपटांची किंवा ओव्हरी वस्ती असेही म्हणतात. ह्या वस्तीच्या मागून जाणारी वाट आपल्याला केंजळगडावर घेऊन जाते. येथून आपण कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी जाऊन पोहचतो. अत्यंत कठीण खडकात छन्नी हातोड्या च्या सह्यांनी ह्या पायऱ्या खोदल्याचे दिसते.एकूण ५५ पायऱ्या आहेत ह्या. आपण खालील फोटो मध्ये पाहून आपल्याला अंदाज येईलच.कोर्ले पासून गड माथ्यावर पोहचण्यास अंदाजे दीड तास लागतो.
किल्ला चढत असताना मागच्या बाजूला रायरेश्वराचे पठार आपले मनमोहक द्रुश्य आपल्याला कायम खुणावत असते.
हा फिरायला फारसा वेळ लागत नाही अगदी एक तास पुरेसा होतो. किल्ल्यावर फारसे अवशेष आढळत नाहीत, पण एक चुन्याचा घाणा, दारूचे कोठार, पडझड झालेली तटबंदी असे आणि एक पाण्याचे टाके असे इतके अवशेष सापडतात. केंजळगडावरून किल्ल्यावरून आपल्यला पूर्वेला कमळगड व पायथ्याला असलेले डोम धरण, पावसाळ्यात हे द्रुश्य अतिशय मनमोहक दिसते.
गड माथ्यावरून दिसणारे धोम धरण व किल्ले कमळगड.
जुन्या काळी दारूचे किंवा धान्याचे कोठार असावे.
काही मंदिराचे अवशेष आणि भग्नावस्थेत असलेल्या मूर्ती देखील आढळतात.
चुन्याचा घाणा.
हे पाहून माझी गड प्रदक्षिणा पूर्ण झाली होती आता माझा परतीचा प्रवास चालू झाला होता. सणा सुदीचा दिवस असल्यामुळे किल्ल्यावर फक्त एकच ६-७ जणांचा एक ग्रुप होता. अश्वमेध adventures त्या ग्रुप चे नाव होते. त्यांची ओळख करून मी पुढे निघालो. आता साधारण दुपारचा एक वाजत होता मी किल्ला उतरण्यास सुरवात केली. सकाळी बस बधून उतरताना परतीच्या गाडीच्या वेळेची चौकशी केली. दुपारी २ वाजता गाडी येते अस सांगितल होत. मला वाटल मी अर्ध्या तासात गड उतरेल पण मला वेळ लागला आणि वाटल आता आपली गाडी चुकणार म्हणून पूर्ण ताकत लाऊन मी जोरात पाळायला सुरवात केली वाटेत एक दोन गावकरी भेटले एक म्हंटले गाडी गेली तर दुसरे म्हंटले कि गाडी येयची आहे अजून. म काय आता आणि जोरात पाळायला सुरवात केली आणि पाहतो तर काय नुकतीच गाडी आली होती. बस पाहून खूप मस्त वाटल. जागा धरली आणि घराच्या दिशेने प्रवास चालू झाला. अनुभवाची नवीन शिदोरी घेऊन सह्याद्री आठवणी जवळ घेऊन मी परतलो.
अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे ते भोर ६०/-
भोर ते कोर्ले २५/-
एकूण खर्च ८५/-
परतीचा एकाचा खर्च :
कोर्ले ते भोर २५/-
भोर ते पुणे ६०/-
एकूण खर्च ८५/-
***काही महत्वाच्या गोष्टी ***
किल्ला चढाई ला अवघड नाही.
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, आपला तंबू असेल तर आपण गडावर राहू शकतो पण खूप वार असत. म्हणून शक्यतो पायथ्याला किंवा पाड्यावर राहावे.
कोर्ले गावात जायला भोर पासून काहीच बस उपलब्ध आहेत त्यांच्या योग्य वेळा नाही मिळाल्या पण तरी पहिली बस सकाळी ७:३० वाजता असते आणि कोर्ले या गावातून शेवटची बस साधारण ४:०० ची आहे. तरी जाण्या पूर्वी आपण नीट चौकशी करून जावे.
राहण्याची व भोजनाची सोय गावात होऊ शकते.
शक्यतो जुन ते जानेवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.
Comments
Post a Comment