निळ्या शार आकाशी

निळ्या शार आकाशी झेप माझ्या स्वप्नांची,
खग दिसता आकाशी जाणीव होते प्रितीची.

माळ रानी गुरे दस दिषासी भटकती,
भव्य वट वृक्षा वरी पाखरे सारे किलबिल करती.

मावळतीला रविराज विलोभनिय दर्शन देती,
अधुन मधुन वरुण राज सुध्दा हलका सा वर्षाव करती.

बाजूच्या वाटेवरूनी दोस्तांच्या गप्पा रंगती,
गप्पा गप्पांमधूनी प्रेमाची आठवण येती.

हृदयाच्या कोपऱ्यात माझ्या, आठवणी तिच्या कल्लोळ करती,
नेत्रान मधूनी अश्रू हळुच गालावर पडती.

निळ्या शार आकाशी झेप माझ्या स्वप्नांची,
खग दिसता आकाशी जाणीव होते प्रितीची.

Comments

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

माहिती होत ती बोलणार नाही काही