How to Reach Ghangad Fort from Pune ( कासे जाल घनगडावर )
घनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या लोणावळ्या पासुन साधारण ३० किलोमीटर असलेल्या एकोले या गावाजवळ आहे, हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. हा किल्ला अंदाजे ३००० फूट उंच असून फारसा अवघड नाही. ह्या किल्ल्याची फार अशी माहिती उपलब्ध नसल्याने इतिहासा बद्दल मला तरी माहिती नाही. पण ह्या किल्ल्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात केली होती. नंतर पुरंदरच्या तहामध्ये हा महाराजांना हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. त्या नंतर महाराजांनी परत तो घेतला त्या नंतर तो राजाराम महाराजांपर्यंत मराठ्यांकडे होता. त्यांच्या मृत्यु नंतर तो परत मोघालांकडे गेला. त्या नंतर परत तो महाराणी ताराबाई यांनी घेतला. या नंतर हाच किल्ला कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांकडे दिला त्यानंतर त्यांनी बालाजी विश्वनाथ पेशवे यांना दिला त्यानंतर त्या दरम्यान मराठ्यांनी कोकणातल्या वाईट लोकांवर आणि पोर्तुगीजांवर हल्ला केला. तेव्हा ह्या किल्ल्यावर २५ सैनिक होते त्यांनी पण ह्यात सहभाग घेतला होता. नंतर ह्या किल्ल्याचा वापार पेशव्यांनी कैदी ठेवण्यासाठी केला. आणि सगळ्यात शेवटी १८१८ साली तो ब्रिटीश्यांच्या कडे गेला.
अनेक दिवसांपासून ह्या किल्ल्यावर जायचं होत सोशल मिडिया वरून अनेक वेळा फोटो वगेरे पहिले होते तेव्हाच इथे जायचं ठरवल होत. पण असा रिकामा दिवसच मिळत नव्हता.एकदा मिळाला होता तेव्हा एका मित्राला विचारल तो हो सुद्धा म्हंटला आणि त्यांनी आजून ४-५ जणांना तयार केल. पण त्या दिवशी खेळताना माझाच पाय मुरगळला म सगळ रद्द झाल. पण बाकी सगळे म कोरीगडावर जाऊन आले.
मग परत साधारण ३ महिन्यांनी अचानक १४ नोव्हेंबर बाल दिनाची सुट्टी मिळाली पण तेव्हा बाकी कोणालाच वेळ नव्हता. माझ नक्की होत घरी कल्पना दिली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० ची लोकल पकडून लोणावळ्याला निघालो. आणि माझा प्रवास घनगडाच्या दिशेने चालू झाला. मनात भीती होती कारण माझी पहिलीच वेळ होती कि एकटाच अनोळखी किल्ल्यावर जाणार होतो. आत्ता पर्यंत कोणी ना कोणीतरी असायचं पण आजचा दिवस तसा नव्हता. फक्त सोशल मिडीयाच्या आधारवरच्या माहितीनिशी मी निघालो होतो. काना मध्ये headphones टाकले आणि निघालो. मस्त सकाळच सुंदर वातावरण थंडी पण होती. धुक मस्त पडल होत मन एकदम प्रसन्न होत. साधारण ८:०० वाजता मी लोणावळ्याला पोहचलो. आणि माझ्या माहिती नुसार किल्ल्याच्या पायथ्याला जाणारी भाबुर्डे ची बस ९:०० वाजता लोणावळा बस स्थानकातून निघणार होती. पण मला लोणावळ्याचे बस स्थानक माहित नव्हते मग google map ची मदत घेतली. आणि स्थानिकांना पण विचारल आणि शोधत साधारण ८:३० ला बस स्थानकात पोहचलो. मग तिथे चौकशी कक्षा मध्ये थोडी चौकशी केली आणि कळाल ती बस ९:०० वाजताच येईल. मग तोवर तसाच वेळ घालवला. अखेर बस आली. तिला निघायला एक दहा मिनिट होती. मग थोडी न्याहारी केली आणि बस मध्ये जाऊन बसलो. वेळेत बस निघाली आणि माझा आता घनगडाच्या दिशेने परत प्रवास चालू झाला. आणि साधारण १०:२० ला मी भाबुर्डे गावात पोहचलो पण तिथून एकोले या पायथ्याच्या गावात चालतच जाव लागत साधारण २०-२५ मिनिट लागतात. ह्या गावात जाताना मला अनेक गावकर्यांनी विचारल कारे जोडीदार क नाही आणला बर झाल असत अस एकट्या ने फिरू नये. मी हसत हसत त्यांना उत्तर देऊन किल्ल्याची वाट विचारून पुढे निघायचो. वाटेत मला घनगड आणि तैलबैला साद घालत होते.
साधारण २५ मिनिटांच्या पायपिटी नंतर मी घनगडाच्या पायथ्याला पोहचलो.
आता माझी खरी घनगडाच्या दिशेने शेवटची पाऊले पडायला लागली होती. अगदी एक तासामध्ये मी किल्ल्यावर पोहचलो पण. किल्ल्याच्या प्रवेश द्वारापाशी माझी आणि खेकड्याची भेट झाली
किल्ल्याच्या प्रवेश द्वाराची अवस्था फारच भग्नावस्थेत आहे हे तशीच अगदी किल्ल्याची पण आहे. खूप वाईट वाटल हे पाहून.
तिथे वर गेल्यावर मला कळाल कि स्थानिक गावातील एका शाळेतील मुलींची तिथे सहल आली होती. पण ते त्या सुरवातीच्या टप्प्यातच थांबल्या होत्या कारण बालेकिल्ल्यावर जायची वाट त्यांना कठीण वाटत होती. शिडी ची सोय त्या ठिकाणी पण तरी अवघड वाटावी अशी वाट आहे ती. मी आधीच ठरवलं होत कि संपूर्ण किल्ला पहायचा आणि मगच मागे फिरायचं. सुरवातीला प्रवेशद्वारातून आत गेलावर मी उजव्या बाजूला गेलो त्या ठिकाणी एक मोठा दगड आहे कि जो मी फोटो मध्ये पहिला होता तो मी प्रत्यक्ष पाहत होतो खूप भारी वाटत होत. उत्साह असल्या मुळे मी त्याच्या पुढे काय आहे हे पाहायला गेलो. तर तिथून अगदी लहान वाट होती पुढे जाण्यासाठी धरण्यासाठी सळई ची सोय केली होती. मी त्याचाच आधार घेऊन पुढे चाललो होतो. इतक्यातच माझ्या चाहुली मुळे तिथे सावली मध्ये आराम करत असलेला साप घाबला आणि अचानक माझ्या समोर आला. आणि मी पण आता थोडा घाबरलो होतो कारण मी एकटाच होतो पण थोड मन घट्ट केल आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला पण तो लगेच पळून गेला. तो काही खूप मोठा नव्हता. तो अनुभव घेऊन मी त्याच वाटेने पुढे निघालो आणि मला एक पुढे छोटी घुहा होती त्यात पाणी जमल होत. म तिथे थामून जरा फोटो काढले जरा शांत बसलो आणि परत निघालो. मग तिथूनच त्या शिडीच्या वाटेने वर निघालो मला त्या शाळेतल्या मुलींच्या बरोबर असलेल्या नी सांगितलं आम्हाला काही वर नाही जाता आल पण तुम्ही जातच आहात तर हळू जावा. आणि मी वर निघोलो. आता मी एकटाच होतो त्या बाले किल्ल्यावर पाउल वाट जिथे नेईल तिथे जायचं ठरवल आणि किल्ल्यावर खूप अस गवत वाढल होत ते काही ठिकाणी माझ्या छाती पर्यंत तर काही ठिकाणी माझ्या कमरे पर्यंत येत होत. अधून मधून मला छोटे सरडे नाकतोडे हे आडवे जात होते. अगदीच सुरवातीला मला साप दिसला होता त्यामुळे मी जरा सावध झालो होतो. मी अगदी आता किल्ल्याच्या माथ्यावर होतो मला नेहमी आवडणार सह्याद्री च ते रूप मी डोळ्यात साठवून घेत होतो आणि फोटो पण काढत होतो. माथ्यावरून तैल बैला अगदी नीट दिसत होता..आता मी परत अजून कुठे काही पाहण्या सारख आहे क हे पाहायला निघालो. पाऊल वाट जशी जाईल तसा मी जात होतो. आणि मला दोन पाण्याचे टाके दिसले त्यात एकात पाणी बरेच होते पण पिण्यायोग्य नव्हते. आणि दुसर कोरडच होत अस वाटत होत म्हणून मी त्यात उडी मारणार होतो पण माझ्या अवजा मुळे तिथे असलेली घोरपड सावध झाली आणि मला पाहून ती घाबरली आणि माझ्या विरुद्ध बाजूने त्या पाण्याच्या टाक्यातून जोरात पळत जाऊन दुसर्या बाजूने बाहेर निघून गेली. तिला पाहून मी पूर्ण घाबरलो होतो कारण हा असा प्रकार मी आधी कधीच पहिला नव्हता आणि पहिला होत ते फक्त टीव्ही वर आणि येथे तर हे अगदी प्रत्यक्ष्यात मी काही सेकंद पूर्ण घाबरलो होतो जेव्हा भानावर आलो आणि फोटो काढू अस वाटल तोवर ती निघून गेली होती. पण ती गेल्यावर मला जास्त भीती वाटत होती कारण मी ज्या गावाता मध्ये थांबलो होतो त्यातच ती विरुद्ध बाजूने गेली होती. म मी आता ठरवलं आता न थांबता थेट खाली जायचं किल्य्यावर पाहण्या सारख अस काही नाही आणि एकटाच ओरडत आवाज करत थेट त्या शिडी पर्यंत येऊन पोहचलो. मग ती शिडी उतरून मी आता साधारण परतीच्या वाटेवर निघालो होतो. दुपारी १२:१५ च्या सुमारास मी किल्ला उतरायला घेतला आणि अवघ्या १० मिनिटात मी किल्ल्यावरून खाली देखील आलो.
आता माझा परतीचा प्रवास चालू झाला मग त्या गावात मी साधारण २ तास त्या बस ची वाट पाहिली म त्याने लोणावळा आणि मग तिथून पुणे. ह्या सगळ्यात मला खूप वेगवेगळे माणस भेटले अनेक असे अनुभव पण मिळाले खूप छान वाटत होत.
अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे ते लोणावळा १५/-
लोणावळा ते भाबुर्डे ४०/-
एकूण खर्च ६५/-
परतीचा एकाचा खर्च :
लोणावळा ते भाबुर्डे ४०/-
लोणावळा ते पुणे १५/-
एकूण खर्च ६५/-
***काही महत्वाच्या गोष्टी ***
किल्ला चढाई ला अवघड नसला तरी किल्ल्यावरचे काही ठिकाण अशी आहेत तिथे काळजी घेण आवश्यक आहे.
पावसाळ्यात प्रचंड धुक असत किल्ल्याला तटबंधी राहिलेली नाही त्यामुळे बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जपूनच राहावे.
किल्ल्यावर राहण्याची सोय आहे दोन मोठ्या गुफा/लेण्या आहेत. किंवा पायथ्याच्या गावात पण होऊ शकते.
भाबुर्डे गावात जायला लोणावळ्या पासून काहीच बस उपलब्ध आहेत त्यांच्या योग्य वेळा नाही मिळाल्या पण तरी पहिली बस सकाळी ९:०० वाजता असते आणि भाबुर्डे या गावातून शेवटची बस दुपारी २:३० ची आहे. तरी जाण्या पूर्वी आपण नीट चौकशी करून जावे.
राहण्याची व भोजनाची सोय गावात होऊ शकते.
शक्यतो जुन ते जानेवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.
किल्ल्यावर अनेक सरपटणारे जीव आहेत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
"Contest entry for The Adventurer Blog Contest November 2017 by Bikat Adventures"
खास रे भाऊडया, आपण जाऊ यात, मला हे सगळं अनुभवायचं आहे।
ReplyDeleteनक्कीच जाऊयात आणि धन्यवाद...
DeleteThanks for sharing such beautiful information. I hope you will share some more information and Please keep sharing.
ReplyDeleteValley of Flowers Trek Cheapest Package details with Himalayan Climber
https://www.himalayanclimber.com/tours/valley-of-flowers/
https://www.himalayanclimber.com
Thanks sir.
Deletenice post
ReplyDelete