कुणी तरी असावं......
कुणी तरी असावं आपल्याला जवळ घेणारं
कुणी तरी असावं आपल्याशी खूप वेळ बोलणारं
कुणी तरी असावं आपल्याशी बोलता बोलता भांडणारं
कुणी तरी असावं आपला राग शांत करणारं
कुणी तरी असावं आपल्याला गोड गोड खायला देणारं
कुणी तरी असावं फिरायला जाताना हातात हात घेणारं
कुणी तरी असावं गाडीवर मागे बसणारं
कुणी तरी असावं पाणी पुरी एकत्र खाणारं
कुणी तरी असावं चित्रपट एकत्र पाहणारं
कुणी तरी असावं रात्री उशिरा sms करणारं
कुणी तरी असावं मला तू आवडतोस म्हणणारं...
Bar bar... Mast...
ReplyDeleteधन्यवाद
Delete