सुंदर असे वातावरण....




सुंदर असे वातावरण
नुकतीच थंडी पडायला सुरुवात झाली होती
एका खोलीच साध छोटं पण मस्त असं घर
वाडा सुद्धा असाच साधा जुना झालेला पण मस्त
वाड्यात खूप शांतता फक्त झाडांच्या पानांचा आणि त्या दोघांच्या गप्पांचा आवाज
अश्या ह्या सुंदर वातावरणात एक वेगळाच गंध
आणि ह्यात ते दोघे मस्त रमून गेले होते त्यांना कशाचच भान नव्हतं

पण काही काळानंतर
तेच वातावरण
तसेच दिवस
तसेच घर
तसाच वाडा
तीच शांतता
तोच गंध
पण ह्या सगळ्या वातावरणा मध्ये तो होता पण ती काळाआड गेली होती.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

How To Reach RajGad Fort From Pune ( कसे जाल राजगडावर )

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

माहिती होत ती बोलणार नाही काही