Posts

मनातील सिंहगड

Image
मेट्रो मधुन प्रवास करताना दिसते सह्याद्रीची डोंगर रांग, सिंहगडा अरे किती आठवणी आहेत तुझ्या हे तुच मला सांग. कामाच्या व्यापामुळे डोक्यामध्ये असतो नुसता ताण, मेट्रो मधुन घरी जाताना, पाहता तुज हरपते माझे भान. सह्य भटक्यांच्या मनात आहे तुझ्या साठी आहे कायम आदराचे स्थान, स्वराज्य राखण्यासाठी तान्हाजीरावांनी दिल स्वतःच बलिदान. तुझा इतिहास आठवताच उंच होते अभिमाने मान. थोर इतिहास कार, शाहीर मावळे गाती तुझे शौर्य गान. सर्व ट्रेकर मंडळींना कायम घालितो तु साद, म्हणुनच तु घरं केलं आहेस आमच्या सर्वांच्या हृदयात. © सौरभ अग्निहोत्री.

स्मित हास्य तिचे खुलले

Image
पाहुनी गुलाब पुष्प, स्मित हास्य तिचे खुलले, मृग नक्षत्रातील सरींनी, सह्याद्रीतील डोंगर–दऱ्या, हीरवाई न बहरले. मनमोहक अशा वातावरणात दोघांतील प्रेम देखील बहरले, त्या दोघांचे प्रेम पाहून, गुलाब पुष्प देखील लाजले. खळखळणारे झरे देखील जागीच थबकले, मदनाच्या वाऱ्याने ढग सुद्धा सरले. जिथे फुलांचे गंधही तिच्यासाठी थांबून राहिले, तिच्या प्रत्येक नजरेत एक अव्यक्त गूज होते दडले. ओलसर मातीच्या दरवळात तिच्या आठवणी रुजल्या, पावसाच्या सरींमध्ये शब्दही नकळत भिजून गेले. त्या धुके छादीत डोंगरावर आम्ही आपली स्वप्ने रेखाटली, एकमेकांच्या नजरेतच आमची सगळी दुनिया सामावली.

रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला,

Image
रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला. मी निघालो होतो तिच्या भेटीला, जुन्या भेटींच्या आठवणी त्या प्रितीच्या. क्षणात चेहरा तिचा मनी माझ्या अवतरला, गळयात माळा तिच्या मोत्यांच्या. केसात मोगऱ्याच्या माळा गुंफलेल्या, साडीचा रंग तिचा निळ्या शार आकाशाचा. गालांवर तिच्या जणु गुलाबाचा रंग उतरलेला, कोमल अश्या स्वरांनी तिच्या मी मात्र घायाळ झालेला. स्पर्श होता तिचा माझ्या अंगाला, शहारा येई माझ्या अंगाला. रात्रीच्या प्रवासात चंद्र होता माझ्या साथीला, चंद्राच्या सोबत चांदण्या त्याच्या साथीला.

हित गूज

Image
आज तिची अचानक भेट झाली, बोलण्याची उत्सुकता दोघांची होती. त्याला काही सांगायचे होते, तिलाही त्याचे ऐकायचे होते. हित गूज चालु होताच, सारे काही हळु हळू धुसर होत गेले. कारण शब्द त्याचे होते, अश्रु तिचे होते. भावना दोघात होत्या पण, व्यक्त मात्र तिलाच करता आल्या. फुलांच्या कळ्या उमलण्या अधिच गळून पडल्या, निर्णय तिने घेतले, वेदना त्याच्या हृदयात झाल्या. तिचे प्रेम होते, दुःख मात्र त्याला झाले. आज तिची अचानक भेट झाली, बोलण्याची उत्सुकता दोघांची होती.

सुर तिचे

Image
मधुर शब्दांचे सुर होते तिचे, कर्ण पटल मंत्र मुग्ध होते माझे. नयनात तिच्या अचानक अश्रु दिसे, मला गमवायची भिती तिला वाटे. नाजुक क्षणाचा प्रसंग तिच्या नजरे समोर दिसे, नजरेस नजर भिडता मी तिचे डोळे वाचे. प्रत्येक भेटींची आठवण मनात कल्लोळ करे, प्रत्येक भेटीत ती माझ्या नव्याने प्रेमात पडे. प्रभात समई अंगणी प्राजक्ताचे सडे पडे, आठवणीत एकमेकांच्या नयनात चटकन अश्रु पडे. कुठेही नजर जाता मला मात्र तिच दिसे, प्रत्यक्ष भेट होताच ती माझ्या मिठीत पडे.

पुण्याहून कसे जाल मोहन दुर्गावर

Image
नमस्कार मित्रांनो, सिंदोळा नंतर पुढचा कोणता किल्ला करायचा हे मनात चक्र चालूच होते पण नक्की कोणता करावा पर्वत गड उर्फ हडसर की मोहन दुर्ग? ईद आणि गणपती अश्या सुट्ट्या सलग आल्या मुळे मी घरात थांबणार नव्हतो हे तर निश्चित होते. म नक्की कुठे जायचं आधी नचिकेत आणि रोहन यांना विचारलं होत माण देशातील किल्ले करूयात पण दोघेही गणपती मध्ये बाहेर नाही येणार बोलले होते. म काय अजून एक दोन जणांना विचारलं होत. पण ते ही नाही बोलले होते. शेवटी पुतण्या आणि एक दोन जण घेऊन राजगड करायचा निर्णय केला होता. पण आदेश ची सोमवार ची सुट्टी अचानक रद्द झाल्याने तो पण प्लॅन बदलून म फक्त एक दिवसात मोहनदुर्ग करायचा नक्की केलं. आणि आमचे पुतणे रद्द झाले. १५ सप्टेंबर २०२४ सकाळी ६ वाजता स्वारगेट येथे जमणार होतो. आदल्या दिवशी रात्री अचानक अथर्व वडके उर्फ जाड्या न आदित्य करडे उर्फ काळ्या कपाळाचा माणूस तयार झाले. पण अथर्व ला कसे एकदम सगळ रॉयल लागते त्यामुळे त्याने मला फोन केला आणि बोलला "काय अहो सौ बस कशाला गाडी ने जाऊ की!" मी थेट नाही बोललो त्याला आणि भाऊ जरा नाराज झाले पण तरीही गडावर येयला तयार झाले. म आदेश ला ...

स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची

Image
वाट पाहत होतो तिच्या येण्याची, स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची. सह्याद्री ने नेसली होती हिरवी साडी, कारवी सुध्दा पायघड्यां साठी तयार होती. सोनेरी अशी कांती तिची, त्यापुढे सोनकी सुध्दा दिसे साधी. मृग नयनी डोळे तिचे, साऱ्यांचेच लक्ष वेधी, हास्य तिचे असे जणु झऱ्यांचे मंजुळ गाणी. इतकं सगळ असूनही आहे ती साधी, माहिती नाही आता ती परत भेटणार आहे कधी. वाट पाहत होतो तिच्या येण्याची, स्वप्ने पाहिली होती तिच्या भेटची.

माहिती होत ती बोलणार नाही काही

Image
माहिती होत ती बोलणार नाही काही, पण पाठवलेले सारे msg/ reels ती कायम पाही. आठवणीत तिच्या माझे मन संपूर्ण न्हाही, मला तिने हो म्हणायची झाली आहे घाई. अजूनही अर्धवट च आहे तिची सही, तिच्या नावा पुढे माझे नाव जोडायची झाली आहे घाई. अंधाऱ्या राती चंद्रा सवे चांदणी, माझ्याकडे राहिल्या आहेत फक्त तिच्या आठवणी. बरसत आहेत पावसाच्या सरी, ती आहे तिच्या घरी न मी माझ्या घरी. माहिती होत ती बोलणार नाही काही, पण पाठवलेले सारे msg/ reels ती कायम पाही.

निळ्या शार आकाशी

Image
निळ्या शार आकाशी झेप माझ्या स्वप्नांची, खग दिसता आकाशी जाणीव होते प्रितीची. माळ रानी गुरे दस दिषासी भटकती, भव्य वट वृक्षा वरी पाखरे सारे किलबिल करती. मावळतीला रविराज विलोभनिय दर्शन देती, अधुन मधुन वरुण राज सुध्दा हलका सा वर्षाव करती. बाजूच्या वाटेवरूनी दोस्तांच्या गप्पा रंगती, गप्पा गप्पांमधूनी प्रेमाची आठवण येती. हृदयाच्या कोपऱ्यात माझ्या, आठवणी तिच्या कल्लोळ करती, नेत्रान मधूनी अश्रू हळुच गालावर पडती. निळ्या शार आकाशी झेप माझ्या स्वप्नांची, खग दिसता आकाशी जाणीव होते प्रितीची.

पुण्यातून सिंदोळा दुर्गावर कसे पोहचाल?

Image
नमस्कार मित्रानो बऱ्याच दिवसांनी आणि माझ्या यादीतील बहुप्रतीक्षित दुर्गांपैकी एक म्हणजे सिंदोळा दुर्ग. ह्या दुर्गाचा इतिहास फारसा उजेडात न आल्याने ह्याची माहिती बऱ्याच जणांना माहितीच नाही. उत्तर कोकणातील बंदरांना जुन्नर (जिर्णनगर) या घाटमाथ्यावरील बाजारपेठेला जोडणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले वेगवेगळ्या काळात बांधले गेले. जुन्नरचे रक्षण करणारा शिवनेरी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हडसर, चावंड, जिवधन, नारायणगड,ह्नुमंतगड-निमगिरी आणि सिंदोळा या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. जूना माळशेज घाट चढून गेल्यावर त्याच्या माथ्यावर असणार्‍या सिंदोळा किल्ल्याची निर्मिती ही प्रामुख्याने घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती . ह्या दुर्गावर अखेर जाण्याचा योग आला तो म्हणजे ५ जुलै २०२४ ला. खर तर बाल मैत्रिण तिच्या सोबत पर्वतदुर्ग म्हणजेच हडसर दुर्गाची सफर करणार होतो पण आयत्यावेळी तिला काही तरी काम आल आणि त्यामुळे तिचे रद्द झाले. म काय मधला अधला वार असल्याने मला जरा सोबत कुणी येईल का नाही याची शंका च होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला मागचा वैराट दुर्गाचा...

वैराट गड - आयुष्यातील एक असाही प्रसंग

Image
किल्ले चंदन-वंदन पाहून आता माझ्याकडे अर्धा दिवस उरला होता. आता वैराट गडाची भ्रमंती करायचे निश्चित झाले होते. वैराट गडावर जाण्यासाठी आपल्याला व्याजवाडी या गावी पोहचावे लागते. व्याजवाडी हे वैराटगडाच्या पायथ्याचे गाव आहे. लालपरी ची वाट पाहत आता मी गणेश खिंडीत थांबलो होतो. १२ वाजता गाडी येणार असे स्थानिकांनी सांगितले. पण वेळेवर येईल ती लालपरी कसली. ती आली १२:३० वाजता. आणि आता माझी वाटचाल आजच्या दिवसातल्या तिसऱ्या गडाकडे चालू झाली होती. हि लालपरी भुईंज या बस स्थानकावर पुन्हा जाणार होती. पण मला व्याजवाडी ला जायचे होते. मी गाडीत बसल्यावर तसे तिकीट काढताना कंडक्टर काकांना विचारले तर त्यांनी सांगितले कि तुम्ही कडेगाव पूल या बस थांब्यावर उतरा आणि तिथून पुढे व्याजवाडी साठी जावा. आणि कडेगावपूल हे तिकीट हातात दिल आणि कंडक्टर पुढे सरकले. मी आता मस्त खिडकी जवळची जागा हेरून बसलो होतो. ग्रामीण साताऱ्याचा मस्त अनुभव मला खिडकीतून दिसत होता. लहानशी घरे, समोर आंगण त्याच्या बाजूला असतील तर काही वेळेस जनावर किंवा लहानगे एकमेकांशी आनंदाने खेळणारे शिवाय भर उन्हात आल्हाद दायक असा हिरवा निसर्ग. कारण हा किल्...

पुण्यातून किल्ले चंदन-वंदन ला कसे जाल (How to Reach Chandan-Vandan fort from Pune)

Image
हि पोस्ट लिहायला खर तर तसा चांगलाच उशीर झाला आहे पण असो. बरेच दिवस झाले कुठे गेलो नव्हतो आणि solo trek पण केला नव्हता. एक दिवस सुट्टी मिळाली तारीख होती २९ मार्च २०२३. मग काय आदल्या दिवशी रात्री साताऱ्या लागत असलेल्या चंदन-वंदन या जोड गोळीची निश्चिती केली. इंटरनेट आणि पुस्तकात ज्याबद्दल वाचल होत ते आज पाहायला मिळणार. खूप उत्सुकता होती. साधारण पहाटे ५ वाजता घर सोडल आणि प्रवास चालू झाला.थोडा वेळ वाट पाहून शनिवारवाडा ते स्वारगेट अशी PMT मिळाली. स्वारगेट बस स्थानकामध्ये साधारण ५:३० वाजता पोहचलो, तिथे कळले कि साताऱ्या ला जाणारी गाडी ६:०० वाजता निघणार आहे. मग गाडी मध्ये बसून गाडी निघायची वाट पाहत होतो. वेळ होताच गाडी निघाली आणि आता खऱ्या अर्थाने माझा गडांच्या कडे जाणारा प्रवास चालू झाला होता. साधारणपणे इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले.हि जोड गोळी गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ले या प्रकारामध...

शब्द अपुरे आहेत

Image
खुप काही बोलायच आहे पण शब्द अपुरे आहेत, जरी नसली जवळ तु माझ्या, पण माझे मन तुझ्या कडे आहे. शब्द माझ्या मनात आहेत, भावना तुझ्या मनात आहेत, पायातील पैंजण तुझ्या नाजुक स्वरांचे गीत आहेत. होता स्पर्श तुझ्या हातांचा प्राजक्त सुध्दा फुलत आहेत, लांब सडक केसांतुनी भर उन्हात सुध्दा सावली देत आहे. नाजुक तुझ्या नेत्रांमधून अजूनही मला शोधत आहेस, कोमल तुझ्या ओठांवरी अजूनही माझेच नाव आहे. खुप काही बोलायच आहे पण शब्द अपुरे आहेत, जरी नसली जवळ तु माझ्या, पण माझे मन तुझ्या कडे आहे.

आठवण....

Image
आठवण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची, शोधूनी सह्यवाटा संपती,  ओढ लागे हळव्या मनाला तिच्या परत भेटीची....  घनदाट लांब केसातूनी, फुलांच्या माळा गुंफती सौंदर्याने तिच्या सह्याद्रीतील करावी सुध्दा लाजती मधुर असे ते बोल तिचे, गोजीरे गीत गाती रानातील पक्षी सारे, बोल तिचेच ऐकती  पाणीदार डोळे तिचे, शब्दानं विनाच बोलती स्पर्श होता तिचा हाताला, अंग सारे शहारती नजरेस नजर भिडता, मला घायाळ करती ठाऊक नाही काही, तरीही ती लाजती मिठीत घेता तिला, शिंपल्यात मोती निर्मिती  मोत्यांच्या माळातुनी, सुरेख हार निर्मिती  आठवण तिच्या माझ्या पहिल्या भेटीची,  शोधूनी सह्यवाटा संपती,  ओढ लागे हळव्या मनाला तिच्या परत भेटीची.....

गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा

Image
गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा शहारून कळ्या साऱ्या बहरती पुन्हा पुन्हा शब्द ते मधुर सारे थबकती ओठांवरी आकाशी पक्षी हे दसदिशास भटकती निळ्याशार पाण्यातुनी इंद्रधनू हे प्रतिबिंबती मृगनयनी डोळे तिचे हृदयास मोहून जाती रेशमी केसांनमधुनी प्राजक्त च्या माळा गुंफती चाहूल होता तिची आठवणी मनात कल्लोळ करती हातात हात तिचा कोमल अश्या आठवणींचा गंध तो मातीचा स्पर्श तिच्या हातांचा

वजीर सुळका एक चित्तथरारक अनुभव

Image
आधीच्या माझ्या पोस्ट मध्ये वजीर सुळक्याचे वर्णन आहेचे. पण महाराष्ट्रातील सहयाद्री च्या दऱ्या खोऱ्यात आपण हिंडू फिरू लागलो कि आपल्याला हे अनेक वेगवेगळे डोंगर, दऱ्या, घाटवाटा, वेगवेगळ्या नाळी, किल्ले आणि अर्थातच सुळके हे आपल्याला साद घालू लागतात आणि आपली पाऊले अपोआपच तिकडे वळतात. माझे आज पर्यंत साधारण ५३ किल्ले पाहून झाले होते पण त्यात सुळक्याचा सहभाग/अनुभव नव्हता. पण त्याला साजेसे ट्रेक मात्र माझे झाले होते उदा:- ढाक चा बहीरी, अलंग-मदन-कुलंग, लिंगाणा, तैल-बैला इ. पण सुळक्याचा अनुभव नव्हता. बरेच जण बोली भाषेत म्हणतात सुरवात नेहमी लहान गोष्टीनी करावी म्हणजे जड गोष्टी पेलायची सवय लागते. पण माझे मत जरा वेगळेच आहे सुरवातच अवघड गोष्टींपासून करा म्हणजे सोप्पी गोष्ट अजून सोप्पी होते. मला माहिती असलेल्या सह्याद्री मधील काही सुळक्याची नावे खालील प्रमाणे १) कळकराई सुळका २) वानरलिंगी सुळका ३) वजीर सुळका ४) बाण सुळका ५) नवरा- नवरी सुळका साधारण ३ वर्षांपूर्वी मी अशीच सह्य भटकंती करत असताना माझ्या कानी हे नाव प्रथम पडले आणि माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली ती म्हणजे वजीर सुळका सर करा...